
Prakash Ambedkar on One Nation One Election Pune News : केंद्र सरकारने लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक सादर केले आहे. मात्र याला विरोधी पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. इकडे सर्व विरोधक याला विरोध करत असताना इंडिया आघाडीचा घटक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची याबाबतची भूमिका स्पष्ट झालेली नाही. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची भेट घेतली त्यापूर्वी अमित शहा यांनी देखील शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जात शुभेच्छा दिल्या होत्या. आठवडाभरात शरद पवार यांच्या या भाजप नेत्यांशी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
अशातच केंद्र सरकारकडून लोकसभेमध्ये मांडण्यात आलेल्या वन नेशन वन इलेक्शन विधेयकाबाबत शरद पवारांची(Sharad Pawar) राष्ट्रवादी सकारात्मक भूमिकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्व घटनाक्रमावर प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत मांडलं आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) म्हणाले, काँग्रेस पक्षाकडे या बिल संदर्भात भूमिका घेण्यासाठी 5 ते 6 दिवस आहेत. काँग्रेसने योग्य भूमिका घेतली नाहीतर हे बिल मंजूर होईल आणि त्यानंतर सर्व राजकीय पक्ष संपून जातील. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा देखील पक्ष असेल सध्या या विधेयकाबाबत त्यांची भूमिका ही विधेयकाच्या बाजूने असल्यासारखी जाणवत आहे.
या विधेयकाच्या माध्यमातून निवडून दिलेले सरकार हे पाच वर्षासाठी कायम राहणार आहे. यामुळे या विधेयकाच्या माध्यमातून हुकूमशाही येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या विधेयकामुळे लोकांना इच्छा असेल तेव्हा निवडणुका होणार नाही. एखाद्या सरकारने लोकांचा विश्वास गमावला तर लोकांच्या इच्छेनुसार कधीही निवडणुका घेता येत होत्या. मात्र या विधेयकानंतर तो अधिकार नागरिक गमावून बसतील. असं आंबेडकर म्हणाले.
या विधेयकामुळे कोणतीही घटनात्मक संरचणा बदलत नाही असं सांगितलं जात आहे. पण मूळ घटनात्मक संरचणा या बिला मुळे बदल जाणार आहे. या विधेयकामुळे घटनेची मूळ संरचना बदलली जाणार आहे. त्यामुळे ही डिक्टेटरशिपकडे वाटचाल असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.