Sharad Pawar Meet PM Modi : दिल्लीतील PM मोदींसोबतच्या भेटीत नेमकी चर्चा काय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

PM Modi and Sharad Pawar Discussion : राज्यातील राजकारणात मोठ्या उलाढाली सुरू असतानाच शरद पवारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय या भेटीवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Sharad Pawar | Narendra Modi
Sharad Pawar | Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे महायुतीतील अंतर्गत वाद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी, छगन भुजबळांचा बंडाचा पवित्रा तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांची नुकतीच झालेली भेट आणि कालची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट.

या सर्व घटना पाहता राज्याच्या राजकारणात काय उलथापालथ होऊ शकते हे सांगणं कठीण झालं आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी संसद भवनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पवारांनी ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं आहे.

मात्र, राज्यातील राजकारणात मोठमोठ्या उलाढाली सुरू असताना पवारांनी मोदींची (Narendra Modi) भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय या भेटीवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या वाढदिवशी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या होत्या.

Sharad Pawar | Narendra Modi
One Nation One Election : गैरहजर खासदार कोण? भाजपच्या नोटिशीनंतर कारणांची शोधाशोध, महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश...

तर त्याच दिवशी सांयकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शरद पवारांची भेट घेतल्यामुळे ते अजित पवार गटासोबत किंवा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तेव्हापासून शरद पवार गटाच्या भूमिकेबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

अशातच आज शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, आजची भेट ही राजकीय नसून शेतीच्या विषयाशी संबंधित ही भेट असल्याचं पवारांनी सांगितलं आहे. दरम्यान, शरद पवार मोदींना भेटले त्यावेळी साताऱ्यातील दोन डाळिंब उत्पादक शेतकरी देखील त्यांच्यासोबत होते.

Sharad Pawar | Narendra Modi
Amit Shah : आंबेडकरांविषयी अमित शहांच्या कोणत्या विधानामुळे विरोधकांचा संताप? दिल्लीसह महाराष्ट्रतही पडसाद

या भेटीत शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर चर्चा केली केल्याचं पवारांनी सांगितलं. तर यावेळी नरेंद्र मोदींसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांना भेट म्हणून डाळिंब दिली असून या भेटीचे राजकीय अर्थ निघू नयेत यासाठी केवळ पाच मिनिटांचीच ही भेट होती, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com