Sharad Pawar News: फडणवीसांना घायाळ करण्यासाठी पवारांनी योग्यवेळी भात्यातील बाण बाहेर काढलाच; म्हणाले...

Loksabha Election 2024 : 'येत्या काही दिवसांमध्ये आणखी नेत्यांना तुरुंगात टाकले जाऊ शकते. परिस्थिती आणखी बिघडू शकते...'
devendra fadnavis sharad pawar
devendra fadnavis sharad pawarsarkarnama

Sharad Pawar News: महाराष्ट्राचं राजकारण ज्या दिग्गज नेत्यांमध्ये सध्या फिरत आहे त्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा समावेश अग्रक्रमाने करावा लागेल.या दोन्ही नेत्यांमध्ये राज्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद आहे. पवार -फडणवीसांमध्ये नेहमीच आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. त्यातच दोघांकडून एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाही.

आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा ज्वर चढत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख नेते शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

नागपूर येथे महाविकास आघाडीचे यवतमाळमधील उमेदवार संजय देशमुख आणि अमर काळे यांनी मंगळवारी (ता.2) उमेदवारी अर्ज दाखल केला.यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली.या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar)यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.

पवार म्हणाले, महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले असा अप्रत्यक्ष चिमटा पवारांनी फडणवीसांना काढला.

devendra fadnavis sharad pawar
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे 'हे' 40 शिलेदार राज्यभर उडवणार धुरळा

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या सभेत विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.त्या सगळ्यांची देशात लोकशाहीवर हल्ला होत आहे अशी एकच भावना होती. आदिवासी राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत.दिल्लीचे मुख्यमंत्रीही तुरुंगात आहेत. देशाच्या घटनेवर हल्ला होत आहे.त्यामुळेच विरोधी पक्षांनी आघाडी केली.येत्या काही दिवसांमध्ये आणखी नेत्यांना तुरुंगात टाकले जाऊ शकते. परिस्थिती आणखी बिघडू शकते अशी टीकेची तोफही डागली.

तसेच वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना लोकांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता.लोकांमध्ये एक परिवर्तनाची भावना असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी सातारची जागा महाविकास आघाडी 100 टक्के जिंकणार असल्याचा विश्वासही व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन चांगले उमेदवार आहेत.तर बारामतीमध्ये अजून निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली नाही. मतदान व्हायचे आहे.मतदान झाल्यानंतरच येथील जनतेचा कल कळेल.यापूर्वी बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule) जिंकल्या आहेत. भविष्यातही त्या जिंकतील, ही अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

(Edited By Deepak Kullkarni)

devendra fadnavis sharad pawar
Hemant Godse News : नाशिकवरून गोडसेंनी भाजपला सुनावलं; इलेक्टिव्ह मेरीट कुणाकडं तेच सांगितलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com