
Dharashiv News : राष्ट्रीय दुर्बल घटक योजनेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा एनएमएस 2024-2025 आयोजन करण्यात आले होते. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका केंद्रावर सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या आयुक्तांकडे राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे. त्यामुळे आता या सामूहिक कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर काय कारवाई केली जाणार? याकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा झाली. जिल्ह्यातून या परीक्षेसाठी 6 हजार 535 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी जवळपास 215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी लोहारा तालुक्यातील वसंतदादा पाटील शाळेच्या केंद्र क्रमांक 8214 वर एकूण 274 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
त्यापैकी 125 एकाच केंद्रावरील विद्यार्थी निवड यादीत आले आहेत. तर जिल्हाभरातून केवळ 76 विद्यार्थी निवड यादीत आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोहारा तालुक्यातील वसंतदादा पाटील शाळेच्या (School) एका केंद्रावर सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार घडला आहे.
त्यामुळे हा प्रकार गंभीर असून जे विद्यार्थी वर्षभर तयारी करतात त्यांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे (Teacher Assosition) राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केली आहे.
या केंद्रावरील परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात यावी. तसेच दोषी असलेले परीक्षा केंद्र संचालक व पर्यवेक्षकांवर कठोर कारवाई करून हुशार विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्यात यावा.
- बाळकृष्ण तांबारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघ
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.