पंतप्रधान मोदींचा देहू दौरा; भाजपने सोपवली हर्षवर्धन पाटलांकडे महत्वाची जबाबदारी!

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ जून रोजी देहू (ता. मावळ, जि. पुणे) येथे येणार आहेत.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे येत्या १४ जून रोजी देहू (Dehu, ता. मावळ, जि. पुणे) येथे येणार आहेत. मोदी यांचा दौरा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने (BJP) माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यांनी नुकतीच देहू येथे भेट देत पंतप्रधानांच्या दौरा नियोजनाची बैठक घेतली. (Prime Minister Modi's visit to Dehu; BJP gave important responsibility to Harshvardhan Patil)

Harshvardhan Patil
राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधीच फडणवीसांचा अपक्ष आमदारांना फोन!

देशाचे पंतप्रधान प्रथमच देहूनगरीत येत आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाकडून तो भव्यदिव्य करण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री पाटील यांच्याकडे हा दौरा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे.

Harshvardhan Patil
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय : मनसेतून आलेल्या नेत्याला बनविले उपनेते!

त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच देहू येथे जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच, देहू संस्थान, पोलिस आणि इतर विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नियोजनांसदर्भात बैठक झाली. त्या बैठकीस माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संत तुकाराम महाराज देहू संस्थांचे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Harshvardhan Patil
राष्ट्रवादीच्या नेत्याचं गाव फोडून शेजारच्या झेडपी गटाला जोडले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्याबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे पहिल्यांदाच येत आहे. महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे हा दौरा न भूतो न भविष्यती व्हावा, यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. तसे जोरदार नियोजन करण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com