उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय : मनसेतून आलेल्या नेत्याला बनविले उपनेते!

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने नांदगावकर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
Nitin Nandgaonkar-Uddhav Thackeray
Nitin Nandgaonkar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन हाती बांधलेल्या नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांची शिवसेनेच्या (Shivsena) उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार नांदगावकर यांना बढती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Election of Nitin Nandgaonkar as Shiv Sena Deputy Leader)

नांदगावकर यांच्या नियुक्तीची घोषणा शिवसेनेच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने नांदगावकर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. ‘डॅशिंग नेते’ अशी नितीन नांदगावकर यांची ओळख आहे. त्यामुळे भाजपच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी नांदगावकरांचे हुक्कमी अस्त्र उद्धव ठाकरे यांनी बाहेर काढले आहे.

Nitin Nandgaonkar-Uddhav Thackeray
राष्ट्रवादीच्या नेत्याचं गाव फोडून शेजारच्या झेडपी गटाला जोडले!

नितीन नांदगावकर हे अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. मात्र, त्यांनी २०१९ मध्ये हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे पक्षाचे कोणतही पद नव्हते. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसारख्या पक्षाविरोधात लढण्यासाठी शिवसेनेला नांदगावकर यांचा मोठा उपयोग होणार आहे. कारण, त्यांनी कोरोना काळात गोरगरीब लोकांची कामे केली आहेत. रुग्णालयांची भरमसाठी बिले कमी करावीत, यासाठी त्यांनी प्रसंगी रुग्णालय प्रशासनाशी वाद घातला; पण लोकांनी न्याय मिळवून दिला.

Nitin Nandgaonkar-Uddhav Thackeray
राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधीच फडणवीसांचा अपक्ष आमदारांना फोन!

परप्रांतियांविरोधात ठोस भूमिका घेणारा नेता, अशी नितीन नांदगावकर यांची ओळख आहे. परप्रांतीय रिक्षाचालकांना त्यांनी अनेकदा सरळ केले आहे. तसेच, वैद्यकीय उपचाराचे बिल कमी करण्यासाठी डॉक्टरांना केलेली दमबाजी यातून त्यांनी समाजातील गरीब व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत ते फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. नितिन नांदगावकर हे मनसेचे दोन नंबरचे नेते बाळा नांदगावकर यांचे पुतणे आहेत.

Nitin Nandgaonkar-Uddhav Thackeray
मोठी घडामोड : धनंजय महाडिकांनी घेतली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट!

भारतीय जनता पक्षाने उभ्या केलेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नितीन नांदगावकर यांच्यासारखा आक्रमक नेता उपयोगी पडणार आहे. शिवाय भाजप नेत्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची धमकसुद्धा नांदगावकर यांच्यामध्ये आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेत त्यांचा पक्ष कसा उपयोग करून घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com