Pune News : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मास्टरमाईंडला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रामदास ऊर्फ वाघ्या मारणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मारणे हा या खून प्रकरणातील मास्टरमाईंड असून त्याने खून कशासाठी केला, याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
पनवेल येथून फार्म हाऊसवरून रामदास मारणे (Ramdas Marne) याला पनवेल पोलिसांकडून (Panvel Police) अटक करण्यात आली असून त्याच्याबरोबर विठ्ठल शेलार आणि आणखी एका साथीदाराचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना पनवेल पोलिसांनी पुणे पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात दिले आहे.
मारणे याने गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा खून कशासाठी केला, त्यामागे नक्की कारण काय होते, त्याचा प्लॅन कशा पद्धतीने केला आतापर्यंत या प्रकरणात आरोपी असलेला मुन्ना पोळेकर आणि मारणे यांचा संबंध काय, याची संपूर्ण माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोथरुड भागातील सुतारदरा परिसरात गेल्या आठवड्यात 5 जानेवारीला कुख्यात गुंड मोहोळ याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. भरदुपारी करण्यात आलेल्या गोळीबारामुळे कोथरुड परिसरासह संपूर्ण पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पावले उचलत आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली.
वेगवेगळ्या भागात पथके पाठवून पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तसेच या भागातील नागरिकांशी चर्चा करून आवश्यक ते पुरावे गोळा करीत पोलिसांनी या खुनातील आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद केले होते.
या खून प्रकरणात आरोपी पोळेकर हा एक मोहरा असून यामागे मास्टरमाईंड कोणी दुसराच आहे, असा अंदाज सुरुवातीपासूनच पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. त्यानुसार याचा तपास केला जात होता. गुन्हे शाखेच्या वतीने याचा तपास सुरू असून रोज पोलिसांकडून या प्रकरणातील नवनवीन माहिती समोर येत आहे. आता मास्टरमाईंडला अटक केल्याने खुनाचा उलगडा होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिसांनी रविवारी रात्री पनवेल येथून 10 जणांना ताब्यात घेतले आहे, तर पुण्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गुंड विठ्ठल शेलार यासह इतरांचा समावेश आहे. नवी मुंबईतून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणे ऊर्फ वाघ्या हा पोलिसांच्या हाताला लागला आहे.
या प्रकरणात यापूर्वी 13 जणांना अटक
पोलिसांच्या तपासात शरद मोहोळ ह्याचा हत्येचा कट मुन्ना पोळेकर याने दीड वर्षापासूनच आखला होता. आरोपींकडून शरद मोहोळ याला एकट्यात गाठून मारण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
दरम्यान, मुन्ना पोळेकरसह मारेकऱ्यांनी गोळीबाराची तालीम कुठे केली, त्यांना आर्थिक मदत कुणी पुरवली, पिस्तूल कुठून आणले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुळशीमधील हडशी इथं गोळीबाराचा महिनाभर सराव केल्याचं तपासात समोर आलं आहे. तसेच त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 23 जणांना अटक केली असून यात 2 वकीलसुद्धा आहेत.
(Edited By - Rajanand More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.