MLA Prakash Abitkar : बिद्रीच्या निवडणुकीने आबिटकर दुखावले; मेळाव्याकडे पाठ फिरवल्यानं चर्चांना उधाण

Mahayuti : आबिटकर यांची महायुतीच्या मेळाव्यातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे...
MLA Prakash Abitkar
MLA Prakash AbitkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यातील महायुतीतील पक्ष आणि संघटना आम्ही सगळे एकसंघ आहोत हे दाखवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे पार पडले. महासैनिक दरबार येथे झालेल्या मेळाव्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आठवले गट, जनसुराज्य पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील आमदार माजी आमदार-खासदार यांनी झाडून उपस्थिती लावली. मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरले.

महायुतीतील आमदार, माजी आमदार, मंत्री, खासदार हे व्यासपीठावर असताना प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. नुकत्याच पार पडलेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्याबरोबर आघाडी करून आबिटकर यांच्या गटाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यावेळी मुश्रीफ यांच्यासह आमदार पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांनी आबिटकर यांच्या गटावर आरोप प्रत्यारोप केले होते. त्यामुळेच आबिटकर यांनी या महायुतीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली का? अशी चर्चा मेळाव्यास्थळी होती.

MLA Prakash Abitkar
BJP News: भाजपचा राम अवतरला!...;मोदींचा करिश्मा कमी झालाय?

ऐरवी आमदार आबिटकर एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसतील तर त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांना कार्यक्रम स्थळी पाठवत असतात. मात्र अर्जुन आबिटकरही या कार्यक्रमाला न आल्याने बिद्रीच्या निवडणुकीमुळे अबिटकर गट दुखावला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत आमदार प्रकाश आबिटकर या महायुतीच्या मेळाव्यास का उपस्थित राहू शकले नाहीत. याची माहिती कोणालाच देण्यात आली नव्हती. त्यामुळे आबिटकर यांनी या मेळाव्याकडे का पाठ फिरवली याचे कारण समोर आलेले नाही. त्यांच्याकडूनही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीत  नाराजी असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com