Prashant Jagtap : महायुतीच्या उमेदवारांसाठी 'ईव्हीएम'मध्ये मतदान सेट; पवारांच्या नेत्याचे आता जनतेला आवाहन

Prashant Jagtap NCP SharadChandra Pawar party fixing voting EVM : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा 'ईव्हीएम'मध्ये मतदान सेट केल्याचा गंभीर आरोप.
Prashant Jagtap
Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड, असं बहुमत मिळाला आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 'ईव्हीएम'बाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

'ईव्हीएम'मध्ये घोटाळा झाल्यानेच महायुतीचे इतके आमदार निवडणूक जिंकले, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध आकडेवारी देखील देण्यात येत आहे. अशाच प्रकारचे आकडेवारी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, "नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा (Election) निकाल हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आणि धोकादायक निकाल आहे. या निघाल्यामुळे देशातील लोकशाही संपते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे".

Prashant Jagtap
Bapusahab Pathare : नवीन आमदार करण्याचा ट्रेंड 'या' मतदारसंघात कायम; पुण्यात तुतारी वाजली!

हडपसर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढलो. त्या निवडणुकी दरम्यान 25 दिवसांमध्ये जो निवडणुकीचा टेम्पो होता. तसेच नागरिकांच्या मनातली असलेली नाराजी, संताप पाहता विद्यमान आमदार तीस ते चाळीस हजार मताच्या फरकाने पडतील, असं चित्र होतं. त्याबाबत विविध एजन्सीज-ने , सर्वे करणाऱ्या संस्थांनी आणि माध्यमांनी केलेल्या सर्वेमध्ये देखील माझा विजयाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून माझा तब्बल 7 हजार मतांनी पराभव झाला. हे संशयास्पद असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

Prashant Jagtap
NCP SharadChandra Pawar party : आंबेगावात 'सेम टू सेम'ने साधला नेम? पुण्यात मात्र 'सेम टू सेम'ने झाला गेम

महाराष्ट्रातील एकूण विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहिले, तर ज्या उमेदवारांनी आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली. ते दिग्गज नेते 70 हजार ते दीड लाखाच्या मताने निवडणूक हरले. त्यामुळे निश्चित ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे, हे सिद्ध करणार आहे. विधानसभा निवडणुकीत 15 टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला ईव्हीएममध्ये सेट करून देण्यात आलं होतं. हा रडीचा डाव सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला असून या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत, असं जगताप म्हणाले.

या सर्व घोटाळ्यात विरोधात आता महाराष्ट्रातील जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे. आम्ही आमदार व्हायला पाहिजे, असा आमचं म्हणणं नाही. मात्र जे आमदार होतील ते जनतेच्या खऱ्या मतांवर आमदार झाले पाहिजे, असं आम्हाला वाटतं. ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या चुकीच्या असल्याच्या माहिती नागरिकांना आहे. त्यामुळे विजयानंतर आमदारांच्या बहुतांश ठिकाणी मिरवणुका निघाल्या नाहीत. तसंच ज्या ठिकाणी निघाल्या त्या ठिकाणी नागरिकांमध्ये फार उदासीनता दिसून आली. यावरून हा निकाल खोटारडा आणि रडीचा डाव असल्याचं सिद्ध झाल्याचं आरोप जगताप यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com