Pune Police Biryani Case : पोलिस उपायुक्तांना फुकट बिर्याणी; कर्मचाऱ्यावर मात्र कारवाई; काय आहे प्रकरण ?

Pune Police : चुकीचे प्रकरण समोर आणूनही कारवाई केल्याने पोलिस दलात खळबळ
Pune Police
Pune PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी मागितलेली फुकटची बिर्याणी प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलो होतो. त्या प्रकरणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणांमध्ये आता ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रियांका नारनवरे यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग करणे आणि ते माध्यमांना देणे यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (Pune Police) यांनी फुकट बिर्याणी मागवल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनीही त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात आता तब्बल दोन वर्षांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा ठपका ठेवत पोलीस कर्मचारी महेश साळुंके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Pune Police
Sharad Pawar In Baramati : ...अखेर बारामतीकरांपुढे पवार बोललेच; म्हणाले, 'सोडून गेलेल्यांना...'

काय केली कारवाई

पोलिस उपायुक्त नारनवरे यांचा ऑडिओ व्हायरल केल्याप्रकरणी महेश साळुंके यांची तीन वर्षाची वेतन वाढ रोखण्यात आली आहे. पोलिस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुणे शहर पोलिस उपआयुक्त रोहीदास पवार यांनी हे आदेश काढले आहेत. विशेष बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये तत्कालीन उपायुक्तांवर मात्र कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिस दलात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय होते प्रकरण ?

दोन वर्षांपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या त्या क्लिपमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्याला हॉटेलमधून बिर्याणी आणण्याचे ऑर्डर देत होत्या. त्या कर्मचाऱ्यांनी बिर्याणीचे पैस विचारले असता पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केला. (Latest Political News)

त्या कर्मचाऱ्यांनी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचे सांगितले. त्यावर मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये होते. ही ऑडिओ क्लिप पाच मिनिटांची होती. यात मॅडम त्या कर्मचाऱ्याला पुण्यातील नॉनव्हेज पदार्थ कुठे चांगले मिळतात, याबाबत विचारत होत्या.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Police
Parbhani Mahayuti News : परभणीत महायुतीतील कुरबुरी; ठाकरे गटाच्या जाधवांसाठी ठरणार 'प्लसपॉइंट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com