Pune BJP Politics : पुण्यात अजितदादांना घेरण्यासाठी भाजपचा खास प्लॅन; उमेदवारी न मिळालेल्या नाराजांवर नवी जबाबदारी

Pune BJP Assigns Ward In-Charge : अजित पवार यांनी भाजपपुढे आव्हान निर्माण केल्याची पुण्यात चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक यंत्रणा सक्रिय करण्याच्या सूचना केली आहे
Ajit Pawar- BJP
Ajit Pawar- BJP Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज प्रमुख कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना ‘प्रभाग प्रभारी’ पदाची जबाबदारी दिली आहे. या प्रभारींनी त्या प्रभागातील निवडणूक यंत्रणा लावणे, बूथ यंत्रणा लावण्यासह नाराज मतदारांना भेटणे, अन्य पक्षातील महत्त्वाचे प्रवेश करून घेऊन चारीही उमेदवार निवडणूक आणण्याची जबाबदारी दिली आहे. तुमच्या अनुभवाचा वापर या निवडणुकीत करा अशी सूचना देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्व प्रभागात प्रचाराला सुरुवात झाली असली तरी भाजपमध्यील अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची ऐनवेळी उमेदवारी कापली गेल्याने पक्षात अद्यापही नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झालेला असला तरी पक्षाची यंत्रणा प्रचारात उतरलेली नाही.

चारच्या प्रभागामुळे लाखभर मतदारांपर्यंत इतक्या कमी दिवसात पोचू शकत नसल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले आहे. भाजपने १२५ जागांचे लक्ष्य ठेवलेले असले तरी अनेक ठिकाणचे उमेदवार धोक्यात आहेत, काही ठिकाणी विरोधकांकडून जोरदार लढत दिली जाऊ शकते अशा माहिती पक्षाकडे येत आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा बऱ्याच कमी जागा निवडून येण्याची शक्यता भाजपच्या यंत्रणेकडून वर्तवली जात आहे.

Ajit Pawar- BJP
Hidayat Patel Murder Case : मोठी बातमी: काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या हत्येमागे अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'चा जिल्हाध्यक्ष; काँग्रेसच्याच दोन नेत्यांवरही गुन्हा दाखल!

यापार्श्‍वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला प्रत्येक प्रभागातील प्रबळ इच्छुक आणि अनुभव असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले आहे. सुमारे ४५ कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रभाग प्रभारी म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. हे कार्यकर्ते जेथून इच्छुक होते, त्याऐवजी अन्य प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुमची नाराजी आता सोडून पक्षासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. आपला अनुभव वापरून प्रत्येक प्रभागातील निवडणूक यंत्रणा सक्रिय करा, जुन्या मतदारांना भेटा, अन्य पक्षातील नाराजांची मने भाजपच्या बाजून वळवा. त्यातील काहींचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्या अशा सूचना दिल्या.

प्रभागातील बूथ यंत्रणा लावणे, शक्ती केंद्राशी संपर्क ठेवणे, मतदानाच्यापूर्वी पोलिंग एजंट नेमणे ही कामे देखील पूर्ण करून घ्या, अशा सूचना मोहोळ, पाटील यांनी बैठकीत दिल्या आहेत.

यंत्रणा सक्रिय करा, फडणवीसांची सूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (ता. ५) पुण्यात सभेसाठी आले असताना त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. या निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपपुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुण्यात काय स्थिती आहे याचा नेमका अंदाज आल्याने फडणवीस यांनी निवडणूक यंत्रणा सक्रिय करा, सर्वांना प्रचारात उतरवा, जे नाराज आहेत त्यांच्याशी बोला, विकासाचा मुद्दा घरोघरी पोचवा असा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळेच आज मोहोळ, पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला महत्त्व आले आहे.

Ajit Pawar- BJP
Mahapalika Nivadnuk: सतेज पाटलांनी सांगितला महापौरांचा कालावधी; कोल्हापुरात काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com