Devendra Fadnavis: ‘धडे’ की ‘रट्टे’? पुणे भाजपच्या नगरसेवकांसाठी फडणवीसांचा दोन दिवसांचा विशेष क्लास

Pune BJP corporators:दोन दिवसांच्या या कार्यशाळेत महापालिकेतील कारभार, पक्ष संघटना आणि नगरसेवकांची भूमिका यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजपला कारभारावरून सातत्याने टीकेला सामोरे जावे लागत असताना आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांसाठी येत्या ५ आणि ६ ऑक्टोबरला मीरा-भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला मुख्यमंत्री फडणवीस नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. यामुळे महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांना मुख्यमंत्री नेमके काय धडे देणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, निवडणुकीनंतर जेमतेम आठ महिने उलटत असतानाच महापालिकेतील कारभारावरून भाजपला पुणेकरांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच सत्ताधारी पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यातील मतभेदही वेळोवेळी समोर आले आहेत. काही नगरसेवकांनी पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नसल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याची चर्चा होती.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत कारभाराचीही चर्चा रंगली आहे. नगरसेवकांच्या तक्रारी आणि महापालिकेतील विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पदाधिकारी आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली होती. मात्र त्यानंतर बोलत आहे.त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच नगरसेवकांशी संवाद साधणार असल्याने या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नगरसेवकांना धडे की पदाधिकाऱ्यांना इशारा?

दोन दिवसांच्या या कार्यशाळेत महापालिकेतील कारभार, पक्ष संघटना आणि नगरसेवकांची भूमिका यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्षातील प्रमुख नेते या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांसमोर पक्ष नेतृत्व नेमका कोणता ‘रोडमॅप’ ठेवणार, याकडे लक्ष लागले आहे.

devendra fadnavis
Pravin Darekar: भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा अपघात! ईस्टर्न फ्री वेवर नेमकं काय घडलं?

पुणे महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या तक्रारी यापूर्वीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या संवादाकडे केवळ प्रशिक्षण कार्यशाळा म्हणून पाहिले जात नसून, महापालिकेतील कारभार आणि पक्षांतर्गत समन्वयाबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडून मार्गदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘परंपरेनुसार कार्यशाळा’

याबाबत सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकांची कार्यशाळा परंपरेनुसार आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

devendra fadnavis
Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दिवाळीत पगार वाढणार! पंजाब सरकारने केली DA मध्ये थेट 8 टक्के वाढ

महापालिकेतील कारभारावरून विरोधकांकडून होणारी टीका, नगरसेवकांच्या तक्रारी आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दोनदिवसीय कार्यशाळेत नेमके काय घडणार, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री नगरसेवकांना कारभाराचे धडे देणार की पदाधिकाऱ्यांनाही ‘रट्टे’ देणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com