BJP Politics : फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप आमदार डिस्टर्ब? पक्षात इन्कमिंग सुरू होण्याआधीच म्हणाला, 'हिम्मत असेल तर समोर या, पक्षात नको...'

Pune BJP Internal Rift : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत. तसं भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुका लढवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी तब्बल तीन ते चार इच्छुक निवडणुकीचे तयारी करताना दिसत आहेत.
BJP leader Yogesh Tilekar
BJP leader Yogesh Tilekar expressed strong displeasure over incoming leaders in Pune, signaling growing internal unrest within the party.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News,16 Oct : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत. तसं भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुका लढवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी तब्बल तीन ते चार इच्छुक निवडणुकीचे तयारी करताना दिसत आहेत.

असं असलं तरी सध्या भाजपमध्ये इन्कमिंगचा वारं जोरदार वाहत असल्याचम पाहायला मिळत आहे. अनेक मित्र पक्ष आणि विरोधातील नेते भाजपमध्ये इन्कमिंगसाठी इच्छुक आहेत. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्ट्राँग उमेदवारांना पक्ष प्रवेश दिला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे एक प्रकारे इन्कमिंगला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानंतर पुण्यातील वरिष्ठांनी इन्कमिंगची यादी देखील तयार करायला घेतली आहे. पुढील काही दिवसांमध्ये पंधरा स्ट्राँग उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

BJP leader Yogesh Tilekar
Sharad Koli : 'भाजप, काँग्रेस की RSS? नितेश राणे कुणाची पैदास..., हाफ चड्डीवाल्यांना शिव्या घालणारे संघाला चालतात का?' ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल

त्यानंतर आता कार्यकर्ते उघड उघड नाराजी व्यक्त करत असून याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना पत्र लिहून तसेच भेटून कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायचा का? आणि निवडणुका आल्या की इतर पक्षातील उमेदवार तुम्ही घेणार का? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

तिकडे कार्यकर्ते नाराज असताना हातात दुसरीकडे पक्ष प्रवेशामुळे आमदार देखील डिस्टर्ब असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये ठाकरेंच्या सेनेतील पाच नगरसेवकांनी प्रवेश केला होता. त्यात हडपसर विधानसभा मतदारसंघातून देखील एक प्रवेश झाला होता. त्यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी या प्रवेशाबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.

BJP leader Yogesh Tilekar
NCP Politics : अमरावतीच्या आमदार नागपूरच्या विश्वस्त, अजितदादांच्या राष्ट्रवादीत असंतोष : भाजपचा दबाव असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप

त्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांमुळे आमदार नाराज झाले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही नाराजी योगेश टिळेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. योगेश टिळेकर यांनी याबाबत पोस्ट करताना प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या नेत्याला थेट आव्हान दिलं आहे.

या पोस्टमध्ये योगेश टिळेकरांनी म्हटलं आहे की, 'ठरवलं होत तुझ्याबद्दल बोलायचं नाही पण दर दिवस तुझे कटकारस्थान, तुझं नाटक बघून एकदाच बोलून विषय संपवतो. पराभवाची एवढी भीती वाटते का..? हिम्मत असेल तर समोर या, लढा मैदानात..! माझ्या पक्षात यायची गरजच काय?थोड्या दिवसात live येणार, तारीख आणि वेळ लवकर सांगतो,' असा थेट इशाराच टिळेकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com