Pune CBI New Building Inauguration: पुण्यातील CBI नव्या इमारतीचे आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

Pune cbi new building inaugurated by pm Modi today : पुणे, शिलाँग आणि नागपूर येथे सीबीआयच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे मोदी उद्घाटन करतील,
 pm Modi - CBI New Building
pm Modi - CBI New Building Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पंतप्रधान मोदी हे आज (सोमवारी) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि सीबीआयच्या सर्वोत्तम तपास अधिकाऱ्यांना सुवर्णपदक प्रदान करतील.

या वेळी पुणे, शिलाँग आणि नागपूर येथे सीबीआयच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे पंतप्रधान मोदी ऑनलाइन उद्घाटन करतील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या पत्रकात म्हटले आहे. पुण्यातील येरवडा येथे केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) नव्याने बांधलेल्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

 pm Modi - CBI New Building
Congress Save Democracy Rally: काँग्रेसच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना; अनेक नेते जखमी ; Video व्हायरल

पंतप्रधान सीबीआयच्या ट्विटर हँडलचे उद्घाटन करतील. तसेच, सीबीआयच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधणारे टपाल तिकीट आणि स्मृती नाणे जारी करणार असल्याची माहिती देण्यात आली. सध्या पुणे सीबीआयचे कामकाज आकुर्डी, पिंपरी येथील कार्यालयातून सुरू होते.

 pm Modi - CBI New Building
Ravindra Chavan Attack On Rohit Pawar: भाजपच्या मंत्र्याने काढली रोहित पवारांची औकात; टि्वटवरुन वाद चिघळला..

येरवड्यातील फुलेनगर-आळंदी रस्त्यावरील मेंटल हॉस्पिटलजवळ सीबीआयसाठी आरक्षित जागेवर आता नवीन तीन मजली कार्यालय आणि अधिकाऱ्यांसाठी निवासी संकुल बांधण्यात आले आहे. या प्रकल्पावर सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com