Nashik Mayor Decision : नाशिक महापौरपदाचा पेच: हिमगौरी आडकेंचे पारडे जड; नेत्यांकडून मात्र 'सस्पेन्स' कायम!

Who will be next mayor Nashik : महापौर पदाच्या शर्यतीत हिमगौरी आडके आघाडीवर असून अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून घेतला जाणार असल्याचे नेते सांगत आहेत
Nashik Mayor Decision : नाशिक महापौरपदाचा पेच: हिमगौरी आडकेंचे पारडे जड; नेत्यांकडून मात्र 'सस्पेन्स' कायम!
Published on: 
Updated on: 

Girish Mahajan News: नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे नेत्यांची जवळीक असलेल्या अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. इच्छुक त्यासाठी कामाला लागले आहेत. नाशिकच्या महापौर पदाचा निर्णय या आठवड्यात होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. पक्षाच्या अन्य नेत्यांचाही सल्ला विचारात घेतला जाईल.

नाशिकचे महापौर पद यंदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. यामध्ये स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी अडके या आघाडीवर आहेत. दिपाली कुलकर्णी, दिपाली गीते यांसह अन्य नगरसेविकांनाही महापौर पदाची स्वप्न पडू लागली आहेत. नेत्यांची जवळीक हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे.

Nashik Mayor Decision : नाशिक महापौरपदाचा पेच: हिमगौरी आडकेंचे पारडे जड; नेत्यांकडून मात्र 'सस्पेन्स' कायम!
BJP Shiv Sena tension : बीएमसी रणसंग्राम पेटला! दिल्लीचा आदेश, फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये; शिंदेंची दरे गावाकडे कूच?

भारतीय जनता पक्षाने मागच्या टर्ममध्ये सतीश कुलकर्णी यांना संधी दिली होती. त्यामुळे दिपाली कुलकर्णी यांच्या नावाला पक्षातच विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे नेत्यांपुढेही उमेदवारी ठरविताना पेच आहे. दिपाली गीते या पहिल्यांदाच निवडून आल्या असून गणेश गीते यांच्या त्या पत्नी आहेत. त्या पहिल्यांदाच निवडून आले आहेत. गणेश गीते यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यामुळे गीते यांचे नाव हितचिंतकांनीच पुढे आणल्याचे बोलले जाते.

Nashik Mayor Decision : नाशिक महापौरपदाचा पेच: हिमगौरी आडकेंचे पारडे जड; नेत्यांकडून मात्र 'सस्पेन्स' कायम!
FASTag चे नियम बदलले? तुमच्याकडे 7-सीटर गाडी आहे का? मग 'ही' अपडेट नक्की वाचा!

हिमगौरी अडके या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या स्थायी समितीच्या माजी सभापती आहेत. त्यांच्या मातोश्री शोभना आहेर या माजी उपमहापौर आहेत. तर वडील डॉ बाळासाहेब आहेर हे देखील स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. पक्षाकडे लॉबिंग करण्यासह अन्य दृष्टीने अडके यांचे नाव प्रबळ मानले जाते. या संदर्भात त्यांनी पक्षाकडे इच्छुक म्हणून दावा केला आहे. त्यांच्यासाठी कुटुंबातील व अन्य प्रभावशाली नेते पुढे आले आहेत.

सध्या तरी याबाबतचा अंतिम निर्णय आणि महत्त्वाची भूमिका दोन्हीही मंत्री महाजन यांच्याकडे आहे. अन्य नेत्यांच्या भूमिकेला फारसा वाव नाही. मात्र निर्णय पक्षाच्या स्तरावर होईल असा निरोप अडके यांना दिला जात आहे. महापालिकेत भाजपला महापौरपदासह उपमहापौर आणि स्थायी समिती अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर संधी आहे. त्यामुळे इच्छुकांना अन्यत्र समावेश करण्याची क्षमता भाजपकडे आहे. दृष्टीने पक्ष आणि मंत्री महाजन काय व्यूहरचना करतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.