Pune Crime News : अखेर सात वर्षांनी समृद्ध जीवन फसवणूक प्रकरणातील आरोपी गजाआड

Samruddha Jeevan Fraud : देशभरातील ६४ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे.
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यासह देशभरात गाजलेल्या समृद्ध जीवन फसवणूक प्रकरणातील एका आरोपीला तब्बल सात वर्षांनी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेली सात वर्षे हा आरोपी सीआयडीला गुंगारा देत होता, अखेर त्याला सातारा रस्ता येथे पकडण्यात आले आहे.

समृद्ध जीवन फूडस इंडिया आणि समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज काे-ऑप सोसायटीचा सर्वेसर्वा महेश मोतेवार आणि रामलिंग हिंगे यांनी संपूर्ण देशभरात कंपनीच्या अनेक शाखा उघडल्या होत्या. त्या माध्यमातून गुंतवणूकदारांची आठ हजार सातशे पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंगे फरार झाला होता. रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गोकुळनगर, कात्रज) असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime
Amit Shah : या कारणामुळे अमित शाहांचा गडचिरोली दौरा तडकाफडकी रद्द

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून तो ओळख लपवून राहत होता. रामलिंग हिंगे सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टिप्लेक्सजवळ येणार असल्याची माहिती सीआयडीच्या पथकाला मिळाली. त्यानंतर हिंगे याला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. समृद्ध जीवन समूहाविरुद्ध देशभरात २६ गुन्हे दाखल आहेत. देशभरातील ६४ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एकूण १८ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांतील एकूण २५ आरोपींपैकी महेश मोतेवारसह १६ जणांना अटक करण्यात असून, त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुढील तपासाचे काम पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Crime
Success Story : याला म्हणतात जिद्द,.. मातीच्या घरात राहणारा माणूस झाला आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com