Success Story : याला म्हणतात जिद्द,.. मातीच्या घरात राहणारा माणूस झाला आमदार

Kamleshwar Dodiyar was elected as MLA : आई विकते अंडी, त्याने मजुरीचे काम करून अभ्यास केला; 'गरीबा'ची आमदार होण्याची अप्रतिम कहाणी
Kamleshwar Dodiyar
Kamleshwar Dodiyar sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh : मध्य प्रदेशात निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचलेल्या 230 आमदारांपैकी 205 कोट्यधीश आहेत. एक आमदार 223 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. या श्रीमंतांच्या या 'रेस'मध्ये आजही मातीच्या घरात राहणारा गरीब माणूस आमदार झाला आहे. त्याची आमदार होण्याची अप्रतिम कहाणी.

300 किलोमीटरचे अंतर दुचाकीने कापून भरला अर्ज

मध्य प्रदेशात निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचलेल्या नवनिर्वाचित आमदारांची सरासरी मालमत्ता 11.77 कोटी रुपये आहे. या श्रीमंतांच्या या 'रेस'मध्ये गरीब माणूसही जिंकला आहे. मंजुरी करून शिक्षण घेतलेले आणि टिफिन वितरणाचे काम करणारे कमलेश्वर दोडियार रतलाम जिल्ह्यातील सैलाना मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना चारचाकी वाहनाचे भाडे परवडत नसल्यामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी दुचाकीने 300 किलोमीटरचे अंतर कापले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kamleshwar Dodiyar
Kiran Lohar : स्कॅमर लोहार गुरुजींची भ्रष्टाचाराची रंजक कथा तुम्हाला माहिती आहे का ? ....

कमलेश्वर या 33 वर्षीय आदिवासी तरुणाने अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवली होती. त्यांनी भारतीय आदिवासी पक्षाच्या (बीएपी) तिकिटावर निवडणूक लढवली होती. या पक्षाची स्थापना याच वर्षी सप्टेंबरमध्ये झाली आहे. कमलेश्वर दोडियार यांनी दोन दिग्गज नेत्यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत आमदार राहिलेले काँग्रेसचे हर्ष विजय गेहलोत दुसऱ्या स्थानावर राहिले त्यांचा कमलेश्वर यांनी 4618 मतांनी पराभव केला, तर भाजपचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

कमलेश्वर दोडियार हा अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे. सैलाना येथील राधा कुआ गावातील रहिवासी असलेले डोडियार यांचे अजूनही मातीचे घर आहे. जे पावसाळ्यात गळते. त्याची आई गावात अंडी विकते. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी तिने राजस्थान आणि गुजरातमध्ये मजूर म्हणून ही काम केले आहे. स्वत: कमलेश्वरने या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. बी.ए.ची पदवी मिळवण्यासाठी कमलेश्वरने स्वतः मजुरीचे काम करून पैसे उभे केले. पुढे ते शिक्षणासाठी दिल्लीला गेले. राजधानीत राहून एलएलबी केलेल्या कमलेश्वरने आपला खर्च भागवण्यासाठी टिफिन पोहोचवण्याचे काम केले आहे.

Kamleshwar Dodiyar
Winter Session Nagpur : ...खोके सरकार 420 !' संत्र्यांच्या माळा गळ्यात घालत विरोधकांचे आगळे- वेगळे आंदोलन, पाहा फोटो!

दोन पराभवानंतर हिंमत खचली नाही

दिल्लीत शिक्षण घेऊन गावी परतल्यानंतर कमलेश्वर बराच काळ समाजसेवेत गुंतले होते. 2018 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक ही लढवली होती. तेव्हा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ही त्यांची हिंमत खचली नाही आणि त्यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक ही लढवली. येथेही अपयशी ठरल्यानंतर त्यांना दुसऱ्याच प्रयत्नात विधानसभा निवडणूक जिंकून सर्वांना चकित केले आहे.

Kamleshwar Dodiyar
Winter Session Maharashtra : सुपारी, संत्र्यांची माळ गळ्यात घालून सरकारचा विरोध 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com