Pune Crime News : पुण्यात 'कोयता गँग'ची हिंमत आणखी वाढली; आता खडकी, चंदननगर भागात तरुणांवर हल्ला!

Koyta Gang in Pune : दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील गजबजलेल्या टिळक रस्त्यावर तरुणावर हल्ला झाला होता.
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली आहे. भरदिवसा कोयत्याने हल्ल्याच्या घटना घडत आहेत. किरकोळ वादातून कोयते उगारून दहशत माजवली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील अतिशय गजबजलेल्या टिळक रस्त्यावर एका तरुणावर हल्ला केल्यानंतर, आता खडकी आणि चंदननगर भागात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime
Parner Politics: नीलेश लंकेंचं टेन्शन वाढणार ? रोहित पवारांनी विजय औटींना दिला मोठा शब्द

या ठिकाणी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अक्षय गायकवाड (रा. गवळीवाडा, खडकी बाजार) याने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी मांडा ऊर्फ शुभम कवाळे, सॅम्युअल पाटोळे व साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय गायकवाड हा मित्रांबरोबर औंध रस्त्यावरील पडाळ वस्ती येथे गेला होता आणि तिथून तो पुन्हा खडकी बाजारकडे निघाला होता. दरम्यान, एका टपरीवर थांबला असता, आरोपींशी अक्षयच्या मित्रांचा वाद झाला.

त्यानंतर शुभम, सॅम्युअल हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहाेचले आणि या भागात कशाला आला असं विचारलं, यानंतर झालेल्या वादातून आरोपींनी अक्षयचा मिक्ष नीलेश शिगवण याच्या डोक्यात कोयत्याने वार केला आणि अक्षयवरही हल्ला केला. शिवाय दगडफेक करून परिसराता दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Crime
Nitin Gadkari : पाच राज्यांतच नव्हे संपूर्ण देशात पुन्हा कमळ फुलणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com