Manoj Jarange Patil : आता एक इंचही मागे जणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maratha Reservation And Chhagan Bhujbal : स्वतला ओबीसी नेते म्हणून घेणाऱ्यांचाच विरोध
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्याचा अहवाल २४ डिसेंबरपर्यंत देण्याचा शब्द सरकारने दिला. त्यामुळे आता कुणी कितीही विरोध केला, तर मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे. मराठ्यांनी फक्त एकी टिकवायची आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे सरकणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.

जरांगेंनी नाव न घेता मंत्री (Chhagan Bhubal) छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. कायद्याच्या पदावर बसलेले नेते जातीवाद करीत आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी प्रत्येक गावात एकत्र नांदत आहेत, त्यांचा कुठेही मराठा आरक्षणाला विरोध नाही. परंतु हेच स्वत:ला ओबीसी नेता म्हणून मराठा आरक्षणाला विरोध करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण आपण घेणारच आहोत, एक इंचही आपण मागे सरकणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

Manoj Jarange Patil
Mizoram Assembly Elections Results in Marathi: मिझोरमचे मुख्यमंत्री पिछाडीवर; तर उपमुख्यमंत्र्यांचा पराभव

मनोज पाटील (Manoj Jarange) म्हणाले, 'गेली अनेक वर्षे मराठ्यांनी आरक्षणाची लढाई केली, आता आरक्षण टप्प्यात आले आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेतली जाणार नाही. सत्तर वर्षांपूर्वी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, परंतु त्या दडवून ठेवल्या होत्या. मराठ्यांचा विश्वासघात करण्यात आला. आता मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांचे ओरबडलेले आरक्षण आता हक्काने पुन्हा घेणारच आहोत. २४ डिसेंबर अगोदर कायदा परित होणार असून, त्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे.'

मराठ्यांनी एक राहण्याचे आवाहन करून जरांगे म्हणाले, 'मराठ्यात फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, मराठ्यांनी आता सावध राहून एक राहिले पाहिजे. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांनी इतरांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहावे. आता ही शेवटची संधी आहे.'

जळगाव येथील बालगंधर्व खुले नाट्यगृहात सकल मराठा समाजातर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. मनोज जरागे यांचे जळगावात जोरदार स्वागत करण्यात आले. सभेच्या ठिकाणी वेदांत संतोष पाटील यांच्यासह मुलांच्या हस्ते छत्रपती शिवप्रतीमा, छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा व धान्य देऊन स्वागत करण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange Patil
Telangana Assembly Election : 'बीआरएस'चा निवडून आलेला 'तो' आमदार रात्रीतच रेवंथ रेड्डींच्या भेटीला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com