Pune Crime News : ‘रॉ'चे गुप्त मिशन, 38 कोटींचं बक्षीस अन् थेट अमित शहांसोबत कॉन्फरन्स कॉल; निवृत्त अधिकारासोबत घडलं भलतंच

Retired Officer Trapped in ₹38 Crore Reward Case : संरक्षण मंत्रालयातील अर्ज, वकिलांची फी, दिल्लीचा प्रवास खर्च आणि भेटवस्तूंसाठी थोरात यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले गेले.
Police officials investigating a fraud case in Pune linked to a fake RAW mission, ₹38 crore reward, and Amit Shah’s name.
Police officials investigating a fraud case in Pune linked to a fake RAW mission, ₹38 crore reward, and Amit Shah’s name.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय गुप्तचर विभागात उच्चपदस्थ नोकरी, गुप्त मिशन, 38 कोटींची बक्षिसी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी थेट संपर्काची चमकदार स्वप्नं दाखवल्याचा प्रकार पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्यासोबत घडला आहे. पर्वती पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध फसवणूक आणि कटकारस्थानाचा गुन्हा नोंदवला आहे.

कसे रचे गेले फसवणुकीचे जाळे?

पुण्यातील दत्तवाडी येथील विजयी चैतन्य सोसायटीत राहणारे फिर्यादी सूर्यकांत दत्तात्रय थोरात हे निवृत्त बँक अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांच्या पत्नीचा भाऊ सुनील प्रभाळे याने संपर्क साधून सांगितलं की, त्याचा मुलगा शुभम केंद्रीय गुप्तचर खात्यात उच्चपदावर आहे. त्याने एका गुप्त मिशनसाठी 38 कोटींचं बक्षीस जाहीर झाल्याचं सांगितलं. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी शुल्क, कायदेशीर खर्च आणि वरिष्ठांना भेटवस्तू द्याव्या लागतील, असं आमिष दाखवलं.

विश्वास वाटावा म्हणून आरोपींनी बनावट कॉन्फरन्स कॉल आयोजित करून गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा वापर केला. 2020 ते 2024 दरम्यान, संरक्षण मंत्रालयातील अर्ज, वकिलांची फी, दिल्लीचा प्रवास खर्च आणि भेटवस्तूंसाठी थोरात यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले गेले. यात थोरात यांनी स्वतःचे आणि ओळखीच्या लोकांकडून उसने घेतलेले पैसेही दिले. एकूण 4.06 कोटी रुपये रोख आणि बँक हस्तांतरणाद्वारे आरोपींनी लाटले.

Police officials investigating a fraud case in Pune linked to a fake RAW mission, ₹38 crore reward, and Amit Shah’s name.
Pakistan Airstrikes : पाकिस्तानी लष्कराचं ‘ऑपरेशन’ उलटलं; आपल्याच नागरिकांवर एअरस्ट्राइक, 30 जणांचा मृत्यू

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर थोरात यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शुभम सुनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी शुभमला 1.82 कोटी, ओंकारला 10.93 लाख, प्रशांतला 40.67 लाख, सुनीलला 7 लाख आणि भाग्यश्रीला 1.05 लाख रुपये देण्यात आले होते. उर्वरित रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा झाली होती.

Police officials investigating a fraud case in Pune linked to a fake RAW mission, ₹38 crore reward, and Amit Shah’s name.
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना ‘हे’ पाऊल उचलावंच लागेल; सरकारकडून दुर्लक्षित विभाग 'सशक्त' करायचाय...

चार वर्षं पैसे घालूनही बक्षीस मिळत नसल्याने थोरात यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी पर्वती पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तपासात आरोपींनी खोटी ओळख, बनावट कागदपत्रं आणि खोटे बँक व्यवहार वापरून कट रचल्याचं उघड झालं. सर्व आरोपी धनकवडी आणि सहकारनगर परिसरातील रहिवासी आहेत. सध्या पोलिस बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक तपासणी करत असून, आणखी पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com