Dipti Chaudhari : सरपंच सासूच्या दबावाखाली गर्भलिंग चाचणी; दीप्ती चौधरीने जीवन संपवल्यानं पुण्यातील मोठे हॉस्पिटल रडारवर

Dipti Chaudhari Suicide Case : उरुळी कांचन येथे विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर गर्भलिंग चाचणी, जबरदस्ती गर्भपात व सासरकडील छळाचे गंभीर आरोप समोर आले असून, पुण्यातील नामांकित रुग्णालय तपासाच्या रडारवर आले आहे.
Police investigation underway Dipti Chaudhari Suicide Case as allegations of female foeticide and forced abortion bring a reputed Niramay hospital under scrutiny.
Police investigation underway Dipti Chaudhari Suicide Case as allegations of female foeticide and forced abortion bring a reputed Niramay hospital under scrutiny.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : पुण्यातील उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. उच्चशिक्षित इंजिनियर असलेल्या विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मृत्यू पावलेली महिलेच नाव दीप्ती मगर-चौधरी असे आहे.

या प्रकरणात विशेष धक्कादायक बाब म्हणजे, मृतेची सासू ही सध्या गावाची सरपंच असून त्या भाजप पक्षाशी संलग्न आहे. तसेच सासरे व्यवसायाने शिक्षक आहेत. वंशाला मुलगा हवा म्हणून जबरदस्तीने गर्भपात करायला लावणे, माहेरकडून सतत पैशांची मागणी करणे आणि त्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणे अशा प्रकारे दीप्ती यांना सतत त्रास देण्यात आला होता.

या अत्याचाराला कंटाळून दीप्तीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणामध्ये गर्भनिदान चाचणी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता पुण्यातील एक नामांकित हॉस्पिटल पोलिसांच्या रडारवर आले असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणी दीप्तीची आई हेमलता मगर (वय 50) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू तथा गावच्या सरपंच सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी (सर्व रहिवासी सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दीप्ती मगर-चौधरी आणि रोहन चौधरी यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2019 रोजी थेऊर येथे झाला होता. लग्नानंतर फक्त महिनाभरातच दीप्तीच्या जीवनात त्रास सुरू झाला. पतीने तिच्या चारित्र्यावर अविश्वास व्यक्त करायला सुरुवात केली. याशिवाय, "तू दिसायला आकर्षक नाहीस, तुला स्वयंपाक किंवा घरगुती कामे नीट जमत नाहीत, शेतात राबणाऱ्या महिलांपेक्षा तू कमी आहेस," असे अपमानास्पद टोमणे मारून सासरच्या सदस्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला.

व्यवसाय आणि गाडीसाठी लाखोंची मागणी..

दीप्तीला पहिली मुलगी झाल्याने सासरच्या सदस्यांची नाराजी होती. याच दरम्यान, पती रोहनने आपला एक्सपोर्ट व्यवसाय बंद पडल्याचे सांगून माहेरकडून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली. मुलीला त्रास होऊ नये म्हणून तिच्या आई-वडिलांनी ही रक्कम पुरवली. मात्र, त्यांची लालसा येथे थांबली नाही. लग्नात चारचाकी गाडी न दिल्याबद्दल टोमणे मारत, रोहनने गाडी घेण्यासाठी पुन्हा मोठ्या रकमेची मागणी केली. मुलीचा संसार वाचावा म्हणून माहेरच्यांनी तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

50 तोळे सोन्याचे दागिने बळकावले

लग्नात दीप्तीला माहेरून सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून दिले होते. ग्रामीण भागात चोरीची भीती दाखवून सासू आणि पतीने हे सर्व दागिने काढून घेतले. नंतर विचारणा केल्यावर, हे दागिने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचे सांगण्यात आले.

Police investigation underway Dipti Chaudhari Suicide Case as allegations of female foeticide and forced abortion bring a reputed Niramay hospital under scrutiny.
Pune News : नगरसेवक बायको नामधारी अन्‌‍ पतीच कारभारी‌, पुण्यात 'महिलाराज' खरा चेहरा आला समोर?

'मुलगी नको' म्हणून जबरदस्तीने गर्भपात

नोव्हेंबर 2025 मध्ये घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी ठरली. दीप्ती तेव्हा 5 महिन्यांची गर्भवती होती. सासरच्या सदस्यांनी "वंशाला दिवा हवा आहे" असा हट्ट धरून तिला गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडले. चाचणीत बाळ मुलगी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, दीप्तीच्या विरोध असून देखील तिचा जबरदस्तीने गर्भपात करवण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे.

Police investigation underway Dipti Chaudhari Suicide Case as allegations of female foeticide and forced abortion bring a reputed Niramay hospital under scrutiny.
Pune crime news : पुण्यात भाजप सरपंचाच्या सुनेची आत्महत्या; हुंड्याच्या त्रासामुळे 3 वर्षीय मुलीसमोरच गळफास

दरम्यान आज पोलिसांनी आत्महत्याग्रस्त महिलेच्या पतीला घेऊन हडपसर परिसरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. हडपसर येथील निरामय रुग्णालय या ठिकाणी पोलीस आरोपी पतीला घेऊन गेले होते. त्या ठिकाणी पती आणि डॉक्टरांची एकत्रित चौकशी करण्यात आली मात्र नेमक्या कोणत्या गोष्टीच्या चौकशीसाठी या ठिकाणी पोलीस आरोपीला घेऊन गेले होते याबाबतचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून यावर अधिक बोलणे देखील टाळण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com