Pune News : पुणे जिल्ह्यातील कासारसाई, घोटवडे, पिरंगुट, वडकी, खेडशिवापूर, गराडे आणि लव्हाळे या गावांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम धार्मिक स्थळांवर बाहेरगावच्या मुस्लिम व्यक्तींना प्रवेशबंदी करणारे ग्रामपंचायतींचे ठराव आणि बॅनर लावल्याच्या प्रकारावरून मुस्लिम समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ठरावांच्या विरोधात जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार घटनाविरोधी, बेकायदेशीर आणि सामाजिक सौहार्द बिघडवणारे कृत्य असल्याचे मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते अस्लम सैय्यद म्हणाले.
भारतीय संविधानानुसार कोणत्याही ग्रामपंचायतीला अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर बंधन आणण्याचा अधिकार नाही. कलम 14, 15(1), 25 व 26 या घटनात्मक अधिकारांचा उल्लंघन झाला असून, याला तात्काळ आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. नमाज पठणासाठी येणाऱ्या व्यक्तींना काही गावांत अडवले जात असून, काही ठिकाणी भीतीपोटी बकरी ईदची नमाजही अर्पण करण्यात आली नाही. ही परिस्थिती अत्यंत असहिष्णू आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवणारी असल्याचे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने नमूद केले आहे.
SDPI ने काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्व भेदभावात्मक बॅनर तात्काळ हटवावेत, घटनाविरोधी ठराव रद्द करून संबंधित ग्रामसेवक आणि सदस्यांवर गुन्हे दाखल करावेत, मुस्लिम प्रार्थनास्थळांना सुरक्षा द्यावी, जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र चौकशी करून सर्व ग्रामपंचायतींना स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात, सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारे कार्यक्रम राबवावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.
प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील दाद मागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही घटना केवळ पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला गालबोट लावणारी आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आपली मागणी आहे, असं अस्लम सय्यद म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.