Pune Flood Update : पुण्यात तीन हजार कार्यकर्ते ऑनफिल्ड

Pune Important information : पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शहरात तीन हजार कार्यकर्ते ऑनफिल्ड उतरले आहेत. पूर परिस्थितीच्या उपायोजनेबाबत चंद्रकांत पाटील, मोहोळ आणि धीरज घाटे यांनी दिली महत्त्वाची माहिती दिली आहे.
pune flood
pune floodSarkarnama
Published on
Updated on

Pune News : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत पुणेकरांना मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपाच्या कार्यालयासह शहरातील सर्व खासदार आणि आमदारांची कार्यालये पुढील आठ दिवस मदत केंद्र म्हणून 24 तास खुली राहतील अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.

शहर कार्यालयाशी नागरिकांना मदतीसाठी 9066515656 किंवा 9928814646 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही घाटे यांनी केले आहे. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शहर भाजपच्यावतीने तातडीने ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सर्व आमदार, माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.

घाटे म्हणाले, आज पहाटेपासून संपूर्ण शहरात भाजपचे तीन हजार कार्यकर्ते ऑनफिल्ड असून पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करत आहेत. पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी हलवणे, आवश्यकतेनुसार प्रथमोपचार, निवास, चहा, न्याहारी, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पूर स्थितीवरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. परंतु ही राजकारण करण्याची वेळ नाही आम्ही सर्व लक्ष नागरिकांना मदत करण्यावर केंद्रीत केले आहे.

pune flood
Murlidhar Mohol : खासदार मोहोळांनी पुणेकरांना केल सतर्क, दिल्लीतून दिला खास संदेश

मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले, संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत आहे. आज पहाटेपासून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने पूर स्थिती निर्माण झाली. धरणातून साधारण 40 हजार क्यूसेक्स पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते. परंतु इतके पाणी सकाळी सोडणार याची पूर्वकल्पना प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे होते. नालेसफाईची कामे नीट झालेली नाहीत. आमचे सर्व कार्यकर्ते सकाळपासून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत कार्य करीत आहेत.

pune flood
Ajit pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

याबद्दल बोलतांना चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सुचना देत आहेत. मी स्वतः सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून, भाजपच्या कार्यकर्त्यांना जे जे मदत कार्य करणे शक्य आहे ते ते करण्याच्या सुचना दिल्या आहेत. सुरक्षित स्थळी नागरिकांना हलविणे, औषधे, धान्य, चहा, नाष्टा, भोजन, पिण्याच्या पाण्याचे टँकर, कपडे, पत्रे, ताडपत्री, निवास व्यवस्था अशी मदत केली जात आहे. शासन पातळीवर सर्व निर्णय तातडीने घेतले जातील आणि सर्वोतोपरी मदत केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com