Pune News: भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

Rajni Tribhuvan passed away: त्यांची दूरदृष्टी, हजरजबाबीपणा यामुळे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. पालिका सभागृहात ज्येष्ठ सदस्या या नात्याने त्यांनी दबदबा निर्माण केला.
Rajni Tribhuvan
Rajni TribhuvanSarkarnama

Pune News : पुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या (Rajni Tribhuvan passed away) तीव्र झटक्याने निधन झाले. आज सकाळी त्यांच्या भावाचं निधन झालं होतं म्हणून त्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. रडल्याने त्यांना त्या ठिकाणी त्रास होऊ लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाऊ आणि बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रजनी त्रिभुवन या 2004 ते 2006 दरम्यान त्या पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात विविध समस्या सोडवल्या. त्यांनी महापौर असताना अनेक लोकोपयोगी व धाडसी निर्णय घेतले. त्यासोबतच त्यांची दूरदृष्टी, हजरजबाबीपणा यामुळे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. पालिका सभागृहात ज्येष्ठ सदस्या या नात्याने त्यांनी दबदबा निर्माण केला. त्या झोपडपट्टीतून येणाऱ्या पहिल्या महिला महापौर होत्या.

Rajni Tribhuvan
Pune Politics: निकालापूर्वीच पुण्यात सेलिब्रेशन सुरू; सुळे, धंगेकर, कोल्हेंच्या विजयाचे बॅनर झळकले!

शहरातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी पुणे शहरातील माजी महापौरांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे हे प्रश्‍न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघटनेत रजनी त्रिभुवन यांचा समावेश होता. शहराचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी, प्रथमच अशा प्रकारे माजी महापौर एकत्र आले आहेत. रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात पुण्याला सर्वाधिक महिला महापौर मिळाल्या. यात कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, वत्सला आंदेकर, रजनी त्रिभुवन यांचा समावेश होता. त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून नीता राजपूत यांच्यासह अन्य महिलांना संधी मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com