Guillain Barre Syndrome : पुण्यात GBS रुग्णसंख्येची शंभरी पार, पहिला बळी गेल्यावर केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

GBS Pune patient count : पुण्यात सध्या गुलियन बॅरी सिंड्रोमचे थैमान सुरू आहे. मागील आठ दिवसांमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पुणेकराचं टेन्शन वाढवणारी आहे. ताज्या आकडेवारीनुसार जीबीएस रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे.
GBS Death
GBS DeathSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Jan : पुण्यात सध्या गुलियन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) थैमान सुरू आहे. मागील आठ दिवसांमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पुणेकराचं टेन्शन वाढवणारी आहे. ताज्या आकडेवारीनुसार जीबीएस रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे.

तर या आजारामुळे पुण्यातील (Pune) एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यामुळे केंद्र सरकारही अलर्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील आठ दिवसात जीबीएस रुग्णांची संख्या शंभरी पार गेल्याने महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर उपायोजना करत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने देखील सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक महाराष्ट्रात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे. तर दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी जीबीएस रुग्णांची संख्या ज्या भागात जास्त आहे.

GBS Death
CM Fadnavis and Pune Commissioner : मुख्यमंत्र्यांची पुणे महापालिका आयुक्तांवर नाराजी? ; 'GBS' बाबत माजी आयुक्तांना सोपवली महत्त्वाची जबाबदारी!

त्या परिसरात आजारामागची कारणे शोधण्यासह पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी करण्यासह घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करण्यासह इतर उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले आहेत.

GBS Death
Anjali Damania met Ajit Pawar : धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे बघितल्यानंतर अजितदादा दमानियांना म्हणाले, ''उद्या दुपारी 12 वाजता...''

1500 हून अधिक घराचं निरीक्षण

पुण्यातील एकूण जीबीएस रुग्णांची संख्या रविवारी 111 वर पोहोचली. यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. तर यातील 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते म्हणाले, "प्रामुख्याने हे रुग्ण आढळलेल्या भागातील पाण्यांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होत असून एकदम थोड्य रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com