Pune Hit and Run Case : फडणवीसांनी हात पाय बांधून दादांना पळायला लावलं, धंगेकरांची अजित पवारांवर जोरदार टीका !

Pune Accident News in Marathi : सध्याच्या प्रकरणामध्ये शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजित पवार यांना किती घेतलं जातं आणि त्यांचे किती ऐकले जातं हा महत्त्वाचा भाग आहे. या गंभीर प्रकरणांमध्ये अजित पवार यांना कोणता रोल द्यायचा हे सध्या निश्चित झालेलं नाही. त्यामुळे अजित पवार हे प्रचंड अस्वस्थ..
Devendra Fadnavis - Ajit Pawar
Devendra Fadnavis - Ajit PawarSarkarnama

Pune Porsche Car Accident News : कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून जोरदार राजकारण तापलं असून रोज नवनवीन आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पहायला मिळत आहेत. अशातच शुक्रवारी पुणे दौऱ्यावरती असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी त्या टीकेला उत्तर दिलं आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणावर बोलताना धंगेकर म्हणाले, कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिली आहे. एखाद्या गुन्ह्यामध्ये दोन एफआयआर का केले जातात हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित तपास अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केली हे समोर आले आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले असणार अशीही मोठी शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी करावी आणि या पोलिस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी आमची मागणी आहे.

पोलिस (Police) अधिकारी चुकले होते म्हणूनच पोलिस आयुक्तांकडून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आता त्यांची चौकशी करावी आणि गुन्हा ही दाखल करावा. हे करण्यास जर पोलीस आयुक्त सक्षम नसतील तर त्यांची देखील बदली व्हावी, अशी आमची मागणी असल्याचं आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis - Ajit Pawar
Pune Porsche Accident : 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणात पोलिस आयुक्तांचे धक्कादायक खुलासे... म्हणाले, !

या अपघात प्रकरणावर पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी घेतलेला भूमिकेबद्दल बोलताना आमदार धंगेकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते आहेत. ते काल ही होते आजही आहेत आणि उद्या देखील राहतील. मात्र सध्याच्या प्रकरणामध्ये शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना किती घेतलं जातं आणि त्यांचे किती ऐकले जातं हा महत्त्वाचा भाग आहे.

या गंभीर प्रकरणांमध्ये अजित पवार यांना कोणता रोल द्यायचा हे सध्या निश्चित झालेलं नाही. त्यामुळे अजित पवार हे प्रचंड अस्वस्थ असून 'त्यांचे हात पाय बांधून त्यांना पळायला लावलं आहे, पण ते पळू शकत नसून देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय घेतला' असल्याची टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. शुक्रवारी पुण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी कुठल्याही अधिकाऱ्याला तंबी दिली नाही.दादांची जी भाषा असते ती दिसत नाही त्यामुळे अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी हातपाय बांधून खुर्ची वरती बसवलेले आहे, असेही ते म्हणाले

या कमिश्नरला पहिला हाकलून देतो, असे दादा म्हणाले असते.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात येऊन अधिकाऱ्यांना कोणतेही आदेश देणार नसतील तर ते दादा कसले ? दादा काल काहीच बोलले नाहीत आणि बोलले तर धंगेकरांनी पैसे दिल्याचे आरोप केले तर त्याचे पुरावे द्या, असे बोलले. दादांची ही भाषा नाही. आधीचे दादा असते तर ते या कमिश्नरला पहिल्यांदा हाकलून देतो, असं बोलले असते असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Devendra Fadnavis - Ajit Pawar
Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून आमदार बच्चू कडूंचा 'प्रहार'; म्हणाले घरात पैसा..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com