CP Amitesh kumar News : दोघांना चिरडले, आरोपीला जामीन झाला अन् राजकीय दबावाच्या आरोपावर अमितेशकुमार म्हणतात…!

Pune Porshe Accident : या मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंट सोबत काम करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
CP Amitesh kumar- Porshe Accident
CP Amitesh kumar- Porshe AccidentSarkarnama

Pune News : पुणे शहरात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भयंकर अपघाताच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणला गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ पोलीस आयुक्तांशी भेट घेणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर हे देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

या प्रकारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली. पुणे पोलिस (Police) आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यामुळे गांभीर्याने पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 304 अंतर्गत कलम लावण्यात आले आहे. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. हा आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी आम्ही केली होती, मात्र आमची ही मागणी फेटाळली आहे. आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CP Amitesh kumar- Porshe Accident
Porshe Accident News : पोलिसांनी कायद्यानुसार त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करावा, आमदार धंगेकरांची मागणी !

या मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंट सोबत काम करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पोलिसांनी केली आहे, पोलिसांनी थातुरमाथूर कारवाई केली असं नाही. त्यामुळे कोणीही असं समजू नये. कोणालाही वाचविण्यात येणार नाही.विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डिलरवर देखील कारवाई करण्यात येईल.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.

या प्रकरणात राजकीय (Political) दबाव आणण्यात येत असल्याचे बोलले जात आहे, यावरती बोलतांना पोलीस आयुक्त म्हणाले, या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल.कोणी राजकीय दबाव आणला का? हे यातुन समजेल. ते सर्वांच्या पुढे येईल.आज अनेक सामाजिक आणि राजकीय लोक भेटत आहेत, त्यांचे म्हणणे पण ऐकून उपाय केल्या जातील.

या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येईल. हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे. मात्र हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे. असे देखील पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

(Edited by : Chaitanya Machale)

CP Amitesh kumar- Porshe Accident
Nashik Lok Sabha Election 2024 : भाजप आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com