Pune Hit And Run Case : बेदर'कार' ड्रायव्हिंगमध्ये दोघांचा मृत्यू अन् आरोपीला तात्काळ जामीन कसा?

Pune Police News : आरोपीविरोधात सुरुवातीला 304 (अ) कलम लावले होते. त्यानंतर गांभीर्य लक्षात आल्याने ते बदलून कलम 304 लावण्यात आले.
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama

Pune Crime News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या हायप्रोफाईल अपघातावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या या प्रश्नांना उत्तर देताना पोलिस प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला.

त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपची वैद्यकीय तापसणी आठ तासानंतर झाली. आरोपीविरोधात सुरुवातीला 304 (अ) कलम लावले होते. त्यानंतर गांभीर्य लक्षात आल्याने ते बदलून कलम 304 लावण्यात आले. तसेच गंभीर गुन्हा करूनही आरोपीला तात्काळ जामीन कसा मिळतो, आदी प्रश्न पुण्यासह राज्यातून विचारले जात आहेत. Pune Hit And Run Case

हा अपघात रविवारी (ता. 19) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडला. त्यानतंर याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात सकाळी सव्वाआठला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळीच आरोपीने मद्य सेवन केले का, याची चाचणी करणे गरजेचे होते. तसेच त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे अपेक्षित होते.

या आवश्यक बाबींसाठी पोलिसांनी मात्र दिरंगाई केल्याचे आढळून आले आहे. या कामांसाठी पोलिसांनी तब्बल आठ तास लावले. आरोपीची ब्रेथ अनालायजर आणि वैद्यकीय तपासणी का केली नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यास मोठा उशीर झाल्यानेच पोलिसांनी आरोपीच्या ब्लडटेस्ट करण्याचा निर्णय घेतला.

या हायप्रोफाईल अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. आपघातानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 304 (अ) लावले होते. मात्र हा प्रकार गांभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बदल करून कलम 304 लावले.

या प्रकारामुळे पोलिसांवर राजकीय दबाव होता का? त्यातून पोलिस आरोपीला पाठीशी घालत होते का, आदी प्रश्न विचारले जात आहेत. यावर खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी Devendra Fadnavis खुलासा केला असला तरी पोलिसांवरील संशय कमी होताना दिसत नाही.

Pune Hit And Run Case
Pune Hit And Run Case Update: 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; अगरवाल कुटुंबाचे 'अंडरवर्ल्ड कनेक्शन'

कल्याणीनगर भागात अपघात झाला, त्यावेळी गाडीत चालक होता का? याबाबत पोलिसांकडून कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही काही सांगता येत नाही. अपघातावेळी आरोपीचे आणखी दोन मित्र गाडीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली का, यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही. Pune Porsche Accident

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील पबची चौकशी केली. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र या विभागाने उशिरापर्यंत चालणाऱ्या पबची याआधी तपासणी कधी केली? अल्पवयीन मुलांना पब, बारमध्ये मद्य दिले जात होते, हे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीत कधी दिसून आले नाही का? किती पबचालकांवर ठोस कारवाई करण्यात आली? कारवाई केली तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वी किती पब, बार सील केले आहेत, याची उत्तर देण्याची मागणीही आता होऊ लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Hit And Run Case
Pune Hit And Run Case : आमदार टिंगरे अन् बिल्डर विशाल अगरवाल यांच्या जुन्या नात्याचा 'अर्थ' कोण सांगणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com