Pune Hit And Run Case Update: 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; अगरवाल कुटुंबाचे 'अंडरवर्ल्ड कनेक्शन'

Vishal Agarwal Family Shocking News : पुणे अपघाताला जबाबदार असलेल्या अगरवाल कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे माहिती पोलिस तपासात समोर येत आहे.
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर येथे मद्यधुंद अवस्थेत आलिशान कारच्या अल्पवयीन चालकाने युवक- युवतीला चिरडले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.या घटनेला जबाबदार धरत बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली . ही अटक,, त्याआधी आमदार सुनील टिंगरेंचा हस्तक्षेप, आणि तपासातील बनवाबनवी यामुळे आरोप -प्रत्यारोप राजकीय वातावरण तापलं.

तसेच राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या घटनेनंतर सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यानंतर पमुख्यमंत्री आणि ग़ृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलिसांचं समर्थन करतानाच दोषींना सोडणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.पण आता या प्रकरणानंतर एक धक्कादायक अपडेट पुढे येत आहे. (Hit And Run Case)

Pune Hit And Run Case
Sharad Pawar News: लोकसभेच्या निकालाआधीच पवारांचं मोठं विधान; 'कोणावर अवलंबून राहण्याची वेळ आली तर मोदी...'

पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरणाला गुन्हा दाखल झालेले आरोपीचे वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांचे वडील सुरेंद्र अगरवाल यांच्याविरोधात सत्र न्यायालयात खटला सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. पुणे अपघाताला जबाबदार असलेल्या अगरवाल कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या भावाशी असलेल्या मालमत्तेच्या वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी हात मिळवणी केल्याचा आरोप अटकेत असलेल्या आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र अगरवाल यांच्यावर आहे. पुण्यातील अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप अगरवाल आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल असल्याची धक्कादायक नोंद पोलिसांच्या तपासात समोर आल्यामुळे अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

परंतु, बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही केवळ आयपीसीची कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपपत्र दाखल करेपर्यंत सुरेंद्र कुमार अगरवाल यांना अटक करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

येरवडा पोलिसांनी अपघातानंतर आरोपीविरुद्ध कलम 304 (A) लावले. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यात बदल करून पोलिसांनी कलम 304 लावले. राजकीय दबावातून पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी न्यायालयात अर्ज करण्यापूर्वी कलम 304 लावण्यात आल्याचे सांगत आज पत्रकार परिषदेत सारवासारव केली.

Pune Hit And Run Case
Devendra Fadnavis News : ठाकरेंनंतर आता केजरीवालांची बारी! देवेंद्र फडणवीसांची तोफ दिल्लीत धडाडणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com