Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol News : धंगेकर,मोहोळांना पुन्हा नोटीस; प्रचार खर्चातील तफावत वाढली !

Pune Lok Sabha Constituency : प्रचार खर्चाचा ताळेबंद उमेदवारांनी दिलेल्या खर्चाबरोबर जुळत नसल्याने त्यांना ही नोटीस बजाविण्यात आली आहे. दुसऱ्या तपासणीमध्ये देखील हा ताळेबंद जुळत नसल्याचे समोर आल्याने या उमेदवरांना ही दुसरी नोटीस देण्यात आली.
Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Ravindra Dhangekar, Murlidhar MoholSarkarnama

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. पुण्यातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, तर महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हे दोन्ही उमेदवार जोरदार प्रचार करत असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचारासाठी केलेल्या खर्चाची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक असते.

पुणे लोकसभेची निवडणूक लढविणारे रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे. प्रचार खर्चाचा ताळेबंद उमेदवारांनी दिलेल्या खर्चाबरोबर जुळत नसल्याने त्यांना ही नोटीस बजाविण्यात आली आहे. दुसऱ्या तपासणीमध्ये देखील हा ताळेबंद जुळत नसल्याचे समोर आल्याने या उमेदवरांना ही दुसरी नोटीस देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ही नोटीस दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Loksabha Election : बारामतीत निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रार, नेमकं घडलं काय?

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. पुणे लोकसभेच्या जागेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 13 मे रोजी मतदान होणार असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पुणे लोकसभेच्या निवडणुकीत 35 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारावर झालेला खर्च निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्याबाबतच्या सूचना निवडणूक कार्यालयाने संबधित उमेदवारांना दिलेल्या आहेत.

निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांनी खर्च केलेल्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी झाली यांमध्ये धंगेकर, मोहोळ यांच्यासह अन्य दोन उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात तफावत असल्याचे समोर आले. पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनी 27 लाख 59 हजार 677 रूपयांचा खर्च सादर केला होता. त्यामध्ये 9 लाख 5 हजार 18 रूपयांची तफावत आली होती. तर महायुतीचे उमेदवार मोहोळ यांनी 33 हजार 13 हजार 402 रुपयांचा खर्च सादर केला होता. त्यात 27 लाख 24 हजारांची तफावत आली होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी या दोन्ही उमेदवारांना पहिली नोटीस पाठवून 6 मे पर्यंत यातील तफावत दूर करून हिशोब सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Sunil Shelke News: "पवार 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी' म्हणतात, पण दुसरीकडे दोन हजार टन मटणाच्या...", शेळकेंचा गंभीर आरोप

दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांनी सादर केलेल्या प्रचार खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसले. धंगेकर यांनी आतापर्यंत 38 लाख 89 हजार रूपये खर्च प्रचारासाठी केला आहे. मात्र धंगेकर यांनी सादर केलेल्या प्रचार खर्चात 11 लाख 67 रूपयांच्या खर्चाती तफावत आली. मोहोळ यांनी आतापर्यत 49 लाख 34 हजार रूपयांचा खर्च केला आहे. त्यामध्ये 36 लाख 27 हजार रूपयांची तफावत आली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या दोन्ही उमेदवारांसह अन्य दोन उमेदवारांना दुसरी नोटीस देत तातडीने हिशोब सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, अपक्ष उमेदवार सचिन धनकुडे यांनी निवडणूक प्रचार खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते अद्याप उघडले नाही. तसेच अपक्ष उमेदवार सचिन चोरमले हे पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवार खर्च तपासणीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे निवडणूक ( Election) निर्णय अधिकाऱ्यांनी धनकुडे, चोरमले यांना प्रचार खर्च सादर करण्याबाबत नोटीस काढली आहे.

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Baramati Lok Sabha 2024: 'मेरे पास मेरी माँ है... म्हणणाऱ्या अजितदादांचे सख्ख्या भावानेच उपटले कान; ८६ वर्षांच्या आईला राजकारणात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com