Pune Lok Sabha Constituency : 'तिकीट कन्फर्म', इच्छुकांची गाडी सुसाट..!

Promise of tickets in the upcoming elections will begin : आगामी निवडणुकीत तिकिटाचं आश्वासन घेऊन लोकसभेला रसद पुरविण्याबाबत वाटाघाटी सुरू
Pune District
Pune DistrictSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक महिना राहिला आहे. असं असलं तरी अद्याप जाहीर सभा अथवा मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल दिसत नाही. मात्र, उमेदवार आणि सर्वच प्रमुख पक्षांकडून बैठका आणि मेळाव्यांचा सपाटा लावण्यात आला आहे. या बैठकीच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या स्थानिक नेते आगामी निवडणुकीत तिकिटाचं आश्वासन घेऊन लोकसभेला रसद पुरविण्याबाबत वाटाघाटी करत आहेत.

या वाटाघाटीमध्ये अनेक इच्छुकांना आगामी निवडणुकांमध्ये 'तिकीट कन्फर्म'चा शब्द मिळाला आहे. त्याच इंधनावर यापुढे होणाऱ्या प्रचारात इच्छुकांची गाडी सुसाट धावणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भावी आमदार (MLA), भावी नगरसेवक अशी बिरुदावली आताच वर्तुळातील लोकांकडून मिळत असल्याने हे पदाधिकारी कार्यकर्ते सध्या जाम खुशीत आहे. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला शब्द वरिष्ठ पाळणार का ?, की फक्त वेळ मारून नेण्यासाठी ही फक्त कार्यकर्त्यांची बोळवण आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune District
Baramati Lok Sabha 2024 : धमकावलं असेल तर पोलिसांत तक्रार करा; अजितदादांचे पवारांना प्रत्युत्तर

दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीबाबत चे तिकीट वाटप झाल्यानंतर पुणे (Pune) जिल्ह्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाला आहे. त्यामुळे एक गठ्ठा मतदान मिळावं, यासाठी विविध पातळीवरील उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षातील नाराजांना खूष करण्यासाठी त्यांच्या मताला दुजोरा देण्याखेरीज सध्यातरी पक्षातील वरिष्ठांकडे पर्याय नाही. हीच संधी साधून इच्छुक आपले मनसुबे साधून घेण्याच्या तयारीत आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी उमेदवारांसह पक्षातील वरिष्ठांची लगट वाढवली असून, आपल्या भागातून मताधिक्य देण्याच्या बोलीवर तिकीट फिक्स करण्याची एक कलमी योजना आखली जात आहे.

आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पुनर्वसन करण्याच्या शब्दावर लोकसभा (LokSabha) निवडणुकीसाठी जिवाचे रान करून मताधिक्य देऊ, असे आश्वासन इच्छुकमंडळी देत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणालाही नाराज करण्याची रिस्क पक्षाचे वरिष्ठ घेऊ शकत नाहीत. नेमका याच गोष्टीचा फायदा हे इच्छुक घेत आहेत. याची कल्पना वरिष्ठ पातळीवरदेखील आहे. त्यामुळे शब्द दिला जात आहे. लोकसभा निवडणुका होऊ द्यात त्यानंतर काय करायचं ते पाहू अशा भूमिकेत वरिष्ठ आहेत. त्यामुळे पुढील कालावधीमध्ये असे शब्दांचे खेळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे.

(Edited By : Chaitanya Machale)

R

Pune District
Lok Sabha Election: "मुरलीची 'मुरली' वाजवतो का आव्हाडांची 'पुंगी' हे कळेलच," वसंत मोरे कडाडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com