Pune Lok Sabha Election 2024: "मी मुरलीची 'मुरली' वाजवतो का, जितेंद्र आव्हाडांची 'पुंगी' वाजवतो हे भविष्यात कळेल," असं वक्तव्य करत वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काल वसंत मोरे यांच्या उमेदवारीवरून वंचितवर आणि आंबेडकरांवर टीका केली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वसंत मोरेंमध्ये असे संविधानातले कोणते गुण बघितले? संविधानासाठी लढताना त्यांना कुठे बघितले? ते कुठल्या आंदोलनात आघाडीवरती होते? कुठल्या दलितांच्या मदतीसाठी ते गेले होते?
वसंत मोरे (Vasant More) आणि वंचित हे गणितच मला कळत नाही. वसंत मोरे हे काय कलाकार आहेत. त्यांची कलाकारी काय आहे हे मला समजलेलं नाही. असं वक्तव्य आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी वंचितने मोरे यांना उमेदवारी दिली नाही ना? मोरेंना उमेदवारी देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची मुरली तर वाजवायची नाही ना? असा संशयही आव्हाडांनी व्यक्त केला. आव्हाडांच्या याच टीकेला आता वसंत मोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जितेंद्र आव्हाड हे मोठे नेते आहेत. परंतु, वसंत मोरे समजण्यासाठी त्यांना पुण्यात (Pune) यावं लागेल. आव्हाडांनी माझं काम पाहण्यासाठी माझ्या वॉर्डमध्ये यावं, त्यांना मी माझ्या वॉर्डची सहल करून देतो. मग मी मुरलीची 'मुरली' वाजवतो का, आव्हाडांची 'पुंगी' वाजवतो हे भविष्यात कळेल; असा टोला मोरेंनी आव्हाडांना लगावला. तसंच माझं काम पाहायचं असेल तर जितेंद्र आव्हाडांनी पुण्यात यावं, असं आव्हानही त्यांनी या वेळी दिलं.
मोरे यांना मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्याविषयी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, "मला १०० टक्के मनसेच्या मेळाव्याची आठवण येते. जितके पाडवे झाले, त्या प्रत्येक पाडव्याची गुढी उतरताना मी शिवतीर्थावर होतो. काही आठवणी अशा असतात, ज्या कधीच विसरता येत नाहीत."
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.