Muralidhar Mohol : लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत मोहोळ का ठरले सरस?

Loksabaha Election 2024 : पुण्यातून इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये मुरलीधर मोहोळ हे पहिल्या क्रमांकावर होते.
Muralidhar Mohol
Muralidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Constituency : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 मतदारसंघात उमेदवार देण्यात आले असून यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करत पक्षश्रेष्ठींनी या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे.

गेल्या वर्षी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होईल, असे वाटत होते. त्यावेळी देखील मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. लोकसभेची निवडणुकीची तयारी म्हणून त्यावेळी देखील मोहोळ यांनी कामाला सुरुवात केली होती. शहरातील विविध भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांसमोर जाण्याचे मोहोळ यांनी सुरू केले होते. मात्र ही पोटनिवडणूक झालीच नाही. त्यामुळे शहरातील लोकसभा निवडणुकीचे वातावरण काही प्रमाणात शांत झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Muralidhar Mohol
Murlidhar Mohol News: भाजपाचं पुण्यात धक्कातंत्र! मुळीक, देवधरांचा पत्ता कट, मोहोळांच्या गळ्यात उमेदवारीची माळ

दीड ते दोन महिन्यांपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली होती. पुण्यातून इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) हे पहिल्या क्रमांकावर होते. त्यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर, फ्रेंड्स ऑफ भाजपाचे शिवाजी मानकर यांच्यासह अन्य काही जण लोकसभेसाठी इच्छुक होते.

लोकसभा लढवायची असेल तर मतदारांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संपर्क वाढवला पाहिजे, हे मुरलीधर मोहोळ यांना माहीत होते. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनातून मोहोळ हे सतत नागरिकांच्या संपर्कात येत होते. मतदारांमध्ये जाण्याबरोबरच भाजपचे राज्य सरचिटणीस, तसेच पुणे लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखपदाची जबाबदारी मोहोळ यांच्यावर देण्यात आली होती. या संधीचा पुरेपूर वापर करत मोहोळ यांनी पक्षाचा वरिष्ठ नेते तसेच पदाधिकारी यांच्यामध्ये आपले स्थान निर्माण केले होते. पक्षाच्या सर्वच बैठकांना ते उपस्थित राहत होते.

Muralidhar Mohol
Lok Sabha Election 2024 : पुण्यासाठी दिल्लीश्वरांना हवेत चंद्रकांतदादा? मोहोळ-मुळीकांचा प्रचारही जोरात

भाजपाचे केंद्र पातळीवरील वरिष्ठ नेते तसेच राज्यातील भाजपचे नेते पुणे शहरात आल्यानंतर मोहोळ हे आवर्जून त्यांच्याबरोबर दिसायचे. राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन पक्षाने टाकलेली जबाबदारी ते पार पाडत होते. पक्षामधील इतर पदाधिकारी लोकसभेसाठी इच्छुक असले तरी या काळात कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर मोहोळ यांनी कधीही टीका केली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचेही मोहोळ यांनी कधीही जाहीरपणे सांगितले नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू पक्षाने लोकसभेची निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास आपण ती लढवू असे मोहोळ सांगत होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. भाजपचे(BJP) 100 नगरसेवक निवडून आले. यामध्ये सात ते आठ अनुभवी नगरसेवक वगळता बाकी सर्व नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले होते. त्यामुळे महापौर म्हणून कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. तर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ हे विराजमान झाले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदानंतर मोहोळ यांना महापौर पदाची संधी देण्यात आली. अडीच वर्ष ते महापौर होते.

महापौर म्हणून काम करताना मोहोळ यांनी आपली लोकप्रियता वाढविली. कोरोनाच्या काळात देखील महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक सर्व स्तरावर केले जात होते. लोकसभेसाठी जे इच्छुक उमेदवार होते त्या तुलनेत मोहोळ यांचा करिष्मा अधिक होता. पुणेकरांमध्ये त्यांच्या नावाची एक क्रेझ आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची उठबस असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com