Pune Election Exist Poll : बॅनर मोहोळांचे, पण 'लीड' धंगेकरांचे अन् तेही 90 हजार! काँग्रेस नेत्याचा दावा खरा ठरणार?

Lok Sabha Election : पुणे लोकसभा निवडणूक लढवलेल्या या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा खरा ठरणार का ?
Pune Lok Sabha Election 2024
Pune Lok Sabha Election 2024Sarkarnama

Pune News :  यंदा पुण्यात लोकसभेला चौरंगी लढत झाली असली तर मुख्य लढाई हि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात झाली. नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलमध्ये पुण्याची बाजी हे मुरलीधर मोहोळ मारतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र कॉग्रेस नेत्यांना मात्र धंगेकर तब्बल ९० हजारांचे मताधिक्य घेऊन विजया होतील असा विश्वास आहे. 

एक्झिट पोल मध्ये मुरलीधर मोहळ विजयी होतील असे अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून हे कार्यकर्ते शहरभर बॅनर लावत आहेत. तर दुसरीकडे पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हेच खासदार होतील. एक्झिट पोलचे अंदाज चुकतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

लोकसभेची निवडणूक पुणेकरांनी हाती घेतली होती, प्रचारात त्याचा आम्हाला पदोपदी अनुभव आला. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने धंगेकर यांचा प्रचार केला. पदयात्रा, कोपरा सभा यामधून सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे भेटून धंगेकर यांना पाठिंबा देत होते आणि धंगेकरच खासदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून पुणेकरांची इच्छा पूर्ण झाल्याचे दिसून येईल,

महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचे भाजपचे राजकारण, पंतप्रधान मोदी यांची कार्यपद्धती आणि हुकूमशाहीवृत्ती, महागाई, बेकारी याबद्दल पुणेकरांमध्ये प्रचंड नाराजी होती. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत गेली १० वर्षे सत्ता असूनही भाजपकडून पुण्यासाठी एकही भरीव योजना राबवली गेली नाही, किंबहुना विकासाची वाट लागली. याबद्दल पुणेकरांच्या मनात असलेला संताप मताद्वारे व्यक्त झाला आहे. पुणेकरांनी खासदार म्हणून रविंद्र धंगेकर यांना स्वीकारले आहे. एक्झिट पोलचे अंदाज अनेकदा चुकले आहेत. यावेळी अंदाज चुकलेलेच दिसतील. धंगेकर खासदार झालेले असतील, असं जोशी म्हणाले. 

Pune Lok Sabha Election 2024
Pune Porsche Accident : रक्ताचा नमुना बदलण्याची आयडीया कोणाची, आरोपीच्या आईचा मोठा खुलासा

4 जूनला पुणेकरांचा निकाल येईल आणि पुणेकर जिंकलेला असेल
 


एक्झिट पोल आल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक सध्या पुण्यात आनंदी आहेत त्यांना दोन दिवस आनंदी राहू द्या. निकालाच्या दिवशी पुणेकरांचा उमेदवार विजयी झालेला असेल. अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली.

एक्झिट पोलमध्ये भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विजय घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर भाजप समर्थकांकडून मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत. मात्र मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकरांचा निकाल हा चार जूनला लागेल असा विश्वास आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

Pune Lok Sabha Election 2024
Exit Poll: धोके की खासियत…! फडणवीस-शिंदे-अजितदादांसारखे सक्षम नेते, पण महायुती 30 जागांचा आकडा गाठणार नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com