Murlidhar Mohol - Ravindra Dhangekar
Murlidhar Mohol - Ravindra DhangekarSarkarnama

Murlidhar Mohol News : अण्णा बैठकीकडे वळाले, तर भाऊ गाठीभेटीला गेले !

Pune Lok Sabha Election 2024 : दुपारनंतर वातावरण फिरले, आकाशात काळे ढग गोळा झाले. अचानकपणे जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने सभांच्या नियोजनावर पाणी पडले.

Pune News : पुण्यात भाजप, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा गेला महिनाभरापासून जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास उरल्याने दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. गेले महिनाभरापासून प्रचारधारा सुरू असताना शुक्रवारी दुपारनंतर अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे महाविकास आघाडीसह महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली.

अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसाने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची दैना उडविली. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या पुणे शहर, मावळ आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. शनिवार संध्याकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी उमेदवारांच्या प्रचारार्थ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा, बाईक रॅली, पदयात्रा यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दुपारनंतर वातावरण फिरले, आकाशात काळे ढग गोळा झाले. अचानकपणे पावसाला सुरूवात झाल्याने सभांच्या नियोजनावर पाणी पडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murlidhar Mohol - Ravindra Dhangekar
Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरे, राजसाहेब, देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धुव्वाच धुव्वा'!

दुपारपर्यंत शहरात काही प्रमाणात उन्हाचा चटका जाणवत होता. त्यानंतर वारा वाढला, अचानकपणे पावसाच्या धारा कोसळू लागल्या. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची होणारी सभा रद्द झाली. वडगावशेरी भागात शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा होणार होती. ही सभा रद्द झाल्याचे मेसेज तातडीने सर्व कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले. धंगेकर यांच्या समर्थनासाठी आदित्य ठाकरे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली देखील रद्द करण्याची नामुष्की महाविकास आघाडीवर आली.

महायुतीचे उमेदवार राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सारसबाग येथे होणाऱ्या जाहीर सभेवर देखील पावसाचे सावट होते. ही सभा रद्द होणार की नाही, याबाबत कोणतीही ठोस महिती महायुतीकडून दिली जात नव्हती. चार नंतर शहरातील विविध भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. तेव्हा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची रॅली सुरू होती. ही रॅली थांबवून मुरलीअण्णा बैठकीकडे वळाले. त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

Murlidhar Mohol - Ravindra Dhangekar
Ajit Pawar News : ...पण अजितदादा आजही उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी ?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पावसाच्या कारणाने सभा रद्द झाल्याने नाराज झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवीभाऊ मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास रवाना झाले. धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघात दुपारपासून मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी बोलत होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची रॅली होणार असल्याने रवीभाऊ त्याच्या तयारीत अडकले होते. मात्र पावसामुळे ही रॅली देखील रद्द झाल्याने त्यांनी बाहेर पडत मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करण्यास वेळ दिला. दुपारनंतर अचानकपणे आलेल्या पावसामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची धांदल उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.

Murlidhar Mohol - Ravindra Dhangekar
Brijbhushn Sinh News : दिल्ली हायकोर्टाचा ब्रिजभूषण सिंहांना दणका; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com