Pune Lok Sabha : मुरलीअण्णा, कोल्हेंना गुरुवारचा मुहूर्त 'लाभ'दायी तर बारणेंना सोमवार लकी

पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार 18 ला अर्ज भरणार, पण मावळचे 22 ला का? या कारणामुळे मावळच्या महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज पुणे जिल्ह्यातील इतर तीन मतदारसंघांतील उमेदवारांसह नाही.
Pune Lok Sabha Constituency
Pune Lok Sabha ConstituencySarkarnama

Lok Sabha Constituency : पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार येत्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील मावळ या चौथ्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, मात्र तो 22 तारखेला भरणार आहेत. Latest News on Pune Politics

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुहूर्त काढला असल्याने मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 22 तारखेला आपला अर्ज दाखल करणार आहेत, असे सांगण्यात आले. तसेच त्या दिवशीच तो भरण्याचे ठरले होते, तर बारामती, शिरूर आणि पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांचे 18 तारखेला भरण्याचे नंतर ठरले. त्यात बारामतीची निवडणूक ही मावळच्या अगोदर म्हणजे 7 मे रोजी आहे, तर मावळात 13 मे ला मतदान आहे. हे त्यामुळेही बारामतीचा अर्ज अगोदर दाखल होणार आहे. Current News about Pune Politics

Pune Lok Sabha Constituency
Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात चौरंगी लढत, MIM चा उमेदवार जाहीर; धंगेकरांच्या अडचणी वाढणार

बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा निवडणुकीचे कार्यालय हे पुण्यात आहे. त्यामुळे तेथील महायुतीचे उमेदवार एकत्रित अर्ज भरणार आहेत. त्याच दिवशी आघाडीचे या तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारही आपली उमेदवारी दाखल करणार आहेत, तर मावळचे निवडणूक कार्यालय हे पिंपरी-चिंचवडमध्ये Pimpri Chinchwad आकुर्डी येथे आहे. हे मुख्य कारण मावळचे उमेदवार हे नंतर अर्ज दाखल करण्यामागेही आहे. त्यामुळे बारणेंप्रमाणेच मावळातील आघाडीचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील Sanjog Waghere हेही आपल्या जिल्ह्यातील इतर तीन उमेदवारांसोबत 18 ला नाही, तर नंतर 23 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

दरम्यान, निवडणूक शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. 18 ते 25 एप्रिल असा अर्ज दाखल करण्याचा कालावधी असून, 29 तारखेला माघार घेता येणार आहे. 18 हजार मनुष्यबळ मावळच्या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती सिंगला यांनी या वेळी दिली.

Edited By : Rashmi Mane

R

Pune Lok Sabha Constituency
Sharad Pawar News : जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, फडणवीसांच्या चार्टर विमानाचा खर्च वाया जाणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com