Pune Lok Sabha News : लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच, कोथरूडमधील मोनोरेल प्रकल्प थांबला

Monorail Project in Kothrud : लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून चुकीचा प्रचार होऊ नये, यासाठी भाजपचे एक पाऊल मागे.
Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Murlidhar Mohol, Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेक गोष्टी घडण्यास सुरुवात झाली आहे. कोथरूड भागातील थोरात उद्यानात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला मोनोरेल प्रकल्पदेखील आता काही काळ थांबला आहे.

या भागात हा प्रकल्प उभारला जाऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी घेतलेली भूमिका त्याला खासदार मेधा कुलकर्णी, वंदना चव्हाण यांनी दिलेला पाठिंबा तसेच लोकसभेची उमेदवारीसाठीचे नाव अंतिम झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या ठिकाणी जाऊन केलेले आंदोलन या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या मोनोरेल प्रकल्पाचे काम काही काळासाठी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघातून भाजपची (BJP) उमेदवारी जाहीर झालेले आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून थोरात उद्यानात मोनोरेल प्रकल्प केला जाणार होता. यासाठी पालिकेच्या बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात आली होती. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने या प्रकल्पाचे काम केले जाणार होते.

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाणार असल्याने सकाळी तसेच संध्याकाळी या गार्डनमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. नागरिकांनी यासाठी आंदोलनदेखील केले होते. मात्र, पालिकेचा उद्यान विभाग माघार घेण्यास तयार नव्हता. राजकीय दबावामुळे या प्रकल्पाचे काम थांबविले जात नव्हते.

Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Shirur Loksabha News : राष्ट्रवादीनंतर आता शिरूर भाजपमध्येही नाराजी नाट्य

दरम्यान, कोथरूड (Kothrud) विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या भागातील काही स्थानिक नागरिकांनी त्यांची भेट घेत घेऊन हा प्रकल्पाची माहिती त्यांना दिली होती. खासदार कुलकर्णी यांनीदेखील याला विरोध करत नागरिकांची बाजू घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनीदेखील यासाठी विरोध दर्शविला होता. या प्रकल्पामुळे गार्डनमध्ये असलेल्या झाडांची कत्तल होणार असल्याने हा प्रकल्प होणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीदेखील थोरात उद्यानात जाऊन नागरिकांची भेट घेत मोनोरेल प्रकल्पाला विरोध केला होता. प्रशासनाने आपला हट्ट कायम ठेवत हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारादेखील धंगेकर यांनी दिला होता.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे या प्रकल्पासाठी प्रयत्नशील होते. त्यांना भाजपने (BJP) लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यातच या प्रकल्पाला विरोधी पक्षातील व्यक्तींसह भाजपच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचादेखील विरोध असल्याने याचा गैरफायदा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात घेतला जाण्याची शक्यता होती.

ही बाब लक्षात घेत एक पाऊल मागे घेण्यात आले. थोरात उद्यानात उभारण्यात येणारा मोनोरेल प्रकल्पाचे काम काही दिवस थांबवण्याच्या सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पालिकेला करण्यात आल्या. त्यानंतर या प्रकल्पाचे काम सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात पालिकेच्या नवनियुक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांनीदेखील याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत. झाडे तोडून या ठिकाणी कोणताही प्रकल्प होणार नसल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Congress News : सुप्रीम कोर्टात काँग्रेसला मोठा दिलासा; करवसुलीबाबत सरकार मवाळ

म्हणून होता नागरिकांचा विरोध

थोरात उद्यानात मोनोरेल प्रकल्पासाठी यांत्रिकीकरण केले जाणार होते. यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडावी लागणार होती. हा प्रकल्प झाल्यास उद्यानामध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी जागाच राहणार नाही. त्या ठिकाणचे पदपथ, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार होत्या. त्यामुळे या प्रकल्पासाठी नागरिकांचा विरोध होता.

R

Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Lok Sabha Election 2024: मतदानाला दांडी मारण्याचा प्लॅन चिमुरड्याने हाणून पाडला; आई-बाबांना ताब्यात घ्या! पोलिसांना पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com