Shirur Loksabha News : राष्ट्रवादीनंतर आता शिरूर भाजपमध्येही नाराजी नाट्य

Shirur Loksabha Election Constituency : नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात अजित पवार यांना यश आल्याचे पाहायला मिळत आहे. असं असताना दुसरीकडे मात्र आता भाजपतील अंतर्गत नाराजी नाट्यदेखील समोर आले आहे.
Shirur loksabha
Shirur loksabhaSarkarnama

Pune News : शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावण्याचे काम आज भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत करणार आहेत. मात्र, तत्पूर्वी शिरूरमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य समोर आले असून, भाजपमधील काही नेते या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिरूरमधील राजकीय नाराजी नाट्याचा खेळ काही संपताना दिसत नाही.

आगामी शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) निवडणुकीसाठी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार आहेत. आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन उमेदवारी देण्यास अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे आढळराव यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील (NCP) अनेक नेत्यांनी याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली होती. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात अजित पवार यांना यश आल्याचे पाहायला मिळत आहे. असं असताना दुसरीकडे आता भाजपतील अंतर्गत नाराजी नाट्यदेखील समोर आले आहे.

Shirur loksabha
Lok Sabha Election 2024 : "मोदी लाटेपुढं शरद पवार निष्प्रभ, लंकेंना उमेदवारीसाठी भर घातली"

आज शिरूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक आरती एक्झिक्युटिव्ह, प्रोटेक्ट कंपनी समोर, एकतानगर, चाकण, पुणे नाशिक हायवे येथे होणार आहे. शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टरचे प्रमुख चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तसेच उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, उपनेते इरफान सय्यद उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.

मात्र, आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचे सांगत भाजपचे काही नेते या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. लोकसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर होत असल्याने विधानसभा निवडणुकीबाबत भाजप (BJP) नेत्यांमध्ये संभ्रम आहे. खेड, आळंदी विधानसभेचे समन्वयक भाजप नेते अतुल देशमुख बैठकीला गैरहजर रहणार आहेत. तसेच जुन्नरच्या भाजप नेत्या आशा बुचके यांच्या कुटुंबात दुःखत घटना झाल्याने गैरहजर राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिरूर येथे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीला भाजपचे नेतेच गैरहजर राहणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही नाराजी चंद्रकांत पाटील कशाप्रकारे दूर करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Shirur loksabha
Eknath Shinde : 'कल्याण'साठी ठाण्याच्या जागेवर सोडावं लागणार पाणी? ; शिंदे कसा सोडवणार तिढा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com