Pune Loksabha News : निवडून आल्यावर शर्मिला ठाकरेंचा आशिर्वाद घेणार....वसंत मोरे

Vasant More पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना गृहित धरणं बंद करावे, असा सल्ला वसंत मोरे यांनी दिला.
Vasant More
Vasant Moresarkarnama
Published on
Updated on

Pune Loksabha News : कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. भाजपचे चारशे पारचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. माझा फॉर्मुला 30 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. वसंत मोरे शंभर टक्के पुणे शहरात आघाडी घेणार आहेत. पुणे शहराच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ माझ्याकडे तयार आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी दिल्लीला जाणार आहे. निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरेंची कालची सभा पाहिली आहे. पक्ष सोडल्यानंतर मी माझ्या विचारांशी ठाम आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर पक्षांचा विचार सोडला आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हे चार जूनला कळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कसबा लोकसभेबाबत ते म्हणाले, रवींद्र जंगीकरांनी काम केलं असेल तर लोक त्यांना मतदान करतील. विकास करणे कुठेच अशक्य नसतं.

मी पुणे शहराचा जेव्हा खासदार होईन, तेव्हा संपूर्ण शहराचा विकास करेन. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना गृहित धरणं बंद करावे, असा सल्ला त्यांनी दिला. राज ठाकरे यांनी महायूतीसोबत जाण्याच्या निर्णयावर श्री. मोरे म्हणाले, राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही.

Vasant More
Pune Lok Sabha Election : रवींद्र धंगेकरांचा प्रचार ठाकरेंच्या सेनेने थांबवला ?

कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. भाजपचे चारशे पारचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. माझा फॉर्मुला 30 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. वसंत मोरे शंभर टक्के पुणे शहरात आघाडी घेणार आहेत. पुणे शहरातील विविध विषयावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, पुणे शहरात ट्राफिक नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअर का नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे शहरात सगळ्यात मोठा प्रश्न वाहतुकीचा, पाण्याचा व कचऱ्याचा आहे. पुणे शहराचा विकासाची ‘ब्लू प्रिंट’ माझ्याकडे तयार आहे.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी दिल्लीला जाणार आहे. निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Vasant More
Vasant More News : 'बारामती, शिरुरमध्ये कला दाखवून देईन', वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com