Pune Loksabha News : विजय शिवतारेंनी संजय राऊतांना डिवचलं; म्हणाले, त्यांना सिझोफेनियाची लक्षणे...

Rahul Gandhi News : बारामती लोकसभेवर भाष्य करताना शिवतारे म्हणाले, सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात लीड घेणार आहेत. ही निवडणूक भावकी आणि गावकीची नाही. ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे.
Vijay Shivtare, Sanjay Raut
Vijay Shivtare, Sanjay RautSarkarnama

Pune Loksabha 2024 News : पुण्यातील सभेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यावरून शिंदे गट शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी खासदार राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवतारे म्हणाले, संजय राऊत यांना सिझोफेनियाची लक्षणे दिसताहेत, त्यांना रात्री स्वप्नं पडतात आणि दुसऱ्या दिवशी काय बोलतात त्यांचे त्यांनाच कळत नाही.

विजय शिवतारे म्हणाले, पंतप्रधान मोदींची सभा जिकडे असते तिकडे एसपीजीची कडक सुरक्षा असते. सभेच्या बाहेर हजारो लोकं बाहेर होती. मोठी सभा झाली आणि मोदी सिद्ध विकासावर बोलले. त्यामुळे पुणेकर कालच्या सभेवर खूष आहेत. संजय राऊतांना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी रेसकोर्स मैदानावर सभा घेऊन दाखवा.

काही विरोधक सभेला लोकं पाठवत असतात. सभेतून उठून जायचं आणि त्यांचे कॅमेरामन फोटो काढत असतात. ते व्हायरल केले जाते. मुळात मोदींची कालची सभा एक लाख लोकांची झाली. अशी सभा कुणीही घेऊन दाखवावी, असे आव्हान त्यांनी राऊतांना दिले. शिवतारे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लोकप्रियता आहे. भटकती आत्मा हे जनरल वक्तव्य होतं. कुणाला एकाला टार्गेट केलं असं बोलणं चुकीचे आहे.

Vijay Shivtare, Sanjay Raut
Vijay Shivtare News : शिवतारेंनी अजितदादांना दिला शब्द; 'बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असणार'

कालपासून भटकती आत्मा असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. शरद पवारांवर टीका केली असणे असं म्हणणं चुकीचे आहे. सासवडमध्ये जी आमची सभा झाली, हजारो लोकांची गर्दी होती. संजय राऊतांना माझं खुलं आव्हान आहे, तुम्ही रेसकोर्स मैदानावर सभा घेऊन दाखवा. बारामती लोकसभेवर भाष्य करताना शिवतारे म्हणाले, सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात लीड घेणार आहेत. ही निवडणूक भावकी आणि गावकीची नाही.

ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यात लढाई आहे. उद्या (बुधवारी) संध्याकाळी सहा वाजता भोर मतदारसंघात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मोठी सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून भोर मतदारसंघातील प्रश्न सोडवले जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाघोली आणि वारजे या दोन ठिकाणी नितीन गडकरी यांच्या सभा होणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक सभा बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे. नाना पटोलेंच्या आरोपावर शिवतारे म्हणाले, कालच्या सभेला लोकं उत्स्फूर्तपणे आली होती. मोदींना ऐकण्यासाठी आले होते. नाना पटोले खोटा आरोप करतात. विरोधकांनी जर आरोप केले नाहीत तर त्यांचं दुकानं कशी चालणार, असे प्रत्युत्तर पटोलेंना दिले.

Edited By : Umesh Bambare

R

Vijay Shivtare, Sanjay Raut
Baramati Loksabha : 'माझे वय 62 च्या पुढे, मी किती दिवस थांबायचे', अजितदादा थेट बोलले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com