Pune APMC News: पुणे बाजार समिती; सभापतीपदी दिलीप काळभोर, तर उपसभापतीपदी रवींद्र कंद !

Pune Bajar Samiti News : सर्वपक्षीय पॅनेलने राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवला होता.
Pune Market commitee News :
Pune Market commitee News :Sarkarnama

Pune Market commitee News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलने, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत पॅनेलचा पराभव केला होता. यानंतर आज सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आली. सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर यांची, तर उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. यात विशेष बाब म्हणजे काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे.

Pune Market commitee News :
Shard Pawar News : 'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

सभापती आणि उपसभापतीपदी निवड करण्यासाठी पुणे कृषी बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्वच नव्याने निवडून आलेल्या सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवड पार पडली. सभापती आणि उपसभापतीपदासाठी असे दोनच अर्ज दाखल झाले होते. दिलीप काळभोर आणि रवींद्र कंद केवळ यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार, निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी ही निवड केली.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी सभापतीपदी तर दिलीप काळभोर आणि उपसभापती रवींद्र कंद यांची बिनविरोध निवड केली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, संचालक विकास दांगट, बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी तसेच, यावेळी उपस्थित होते.

Pune Market commitee News :
Missing Women NCRB Data: 'केरला स्टोरी'वरून रान उठवणाऱ्या भाजपाला विरोधकांनी दाखवलं गुजरातमधील वास्तव !

पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट या दोघांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांचे शेतकरी विकास आघाडी पॅनेलने एकूण १३ जागांवर विजय मिळवला.

Pune Market commitee News :
Mla Meghna Bordikar News : लंडनमधील भारतीयांकडून आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर...

तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनेलचे केवळ दोनच उमेदवारांना विजय मिळवता आला होता. व्यापारी - अडते आणि हमाल - मापाडी गटातून तीन उमेदवार निवडून आले होते. तर व्यापारी अडते मतदारसंघातून गणेश घुले, तसेच अनिरुद्ध भोसले, हमाल मापाडीच्या वर्गातून संतोष नांगरे यांची संचालकपदी निवड करण्यात आली होती. (Political Web Stories)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com