Satara News : रयत शिक्षण संस्थेच्या Rayat Shikshan Sanstha आज झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार Sharad Pawar यांची फेरनिवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीत श्री. पवार यांनी सचिव पदाची भाकरी फिरविली नाही. आगामी काळात संस्थेच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकारी बसविला जाणार असल्याची चर्चा आहे.
कर्मवीर पुण्यतिथी दिनी नऊ मे रोजी दर तीन वर्षानी संस्थेचे पदाधिकारी निवडले जातात. आज त्या निवडी होणार होत्या. मात्र या निवडी पूर्ण झाल्या नाहीत. केवळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक, मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य यांचीच निवड करण्यात आली. सचिवपदी इतर कोणाचीही निवड केली नाही.
सध्याचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हेच पुढील सहा महिने राहणार असून सहा महिन्यांनी नवीन सचिवाची निवड केली जाणार आहे. तसेच कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्ष पदाची निवड २७ मे रोजी पुण्यात होणाऱ्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत होणार असल्याची माहिती संस्थेतून देण्यात आली.
दरम्यान, संस्थेत प्रशासनाला योग्य दिशा मिळावी, प्रशासन योग्यरित्या चालावे यासाठी आगामी काळात सचिवपदी सनदी अधिकाऱ्याची नेमणुक केली जाणार असल्याची चर्ची आज संस्थेच्या कार्यालयाच्या परिसरात रंगली होती. या पदासाठी साताऱ्याचे माजी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी वर्णी लागणार असल्याची चर्चाही जोरात सुरु होती. आज नेमण्यात आलेले उपाध्यक्ष , अजिव सेवक आणि मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य पुढील प्रमाणे.उपाध्यक्ष - जयश्री चौगुले (वाशी) , अरुण कडु पाटील, पी. जे. पाटील (उरण), ॲड. राम काडंगे (पुणे), महेंद्र लाड (पलुस).
मॅनेजिंग कौंन्सलचे सदस्य - ॲड. भगिरथ शिंदे, माजी मंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, रामशेठ ठाकुर, ॲड. रविंद्र पवार, मीनाताई जगधने, आमदार डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकुगोंडा पाटील, राहुल जगताप, जनार्धन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्रा. सदाशिव कदम, धनाजी बलभिम पाटील. आजीव सेवक प्रतिनिधी - प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, विनोदकुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, लाईफ वर्कर प्रतिनिधी- नवनाथ जगदाळे, प्रा, डॉ. संजय नगरकर, सौ. ज्योत्स्ना सुधीर ठाकुर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.