MNS Pune News : पुण्यात आंदोलन 'मनसे'चं अन् चर्चा मात्र 'तात्यां'च्या स्टाईलची!

Pune MNS Agitation and Vasant More : सध्या वसंत मोरे मनसेत नाहीत, मात्र त्याच स्टाईलने साईनाथ बाबर हे देखील आंदोलन करून एकप्रकारे त्यांच्या आंदोलनांची आठवण करून देत असल्याचं बोललं जात आहे.
Pune MNS Agitation and Vasant More
Pune MNS Agitation and Vasant MoreSarkarnama

Pune Political News : पुण्यात मनसेकडून सातत्याने विविध विषयांवर हटके पद्धतीने आंदोलन करण्याची स्टाईल प्रचलित झाली आहे. महापालिकेचे पटांगण असो किंवा मग सभागृह अथवा शहरातील कोणता चौक. आतापर्यंत या ठिकाणी मनसेचे माजी नेते वसंत मोरे आणि सध्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे पुणेकरांचे लक्ष वेधून घेणारं, हटके आंदोलन करताना एकत्र दिसायचे.

मात्र लोकसभा निवडणुकीआधीच वसंत मोरे(Vasant More) यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत वेगळी राजकीय वाट निवडली आहे. असं असलं तरी साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली मनसेची हटके आंदोलनाची परंपरा कायम असल्याचं दिसून येत आहे. मात्र आंदोलन जरी मनसेचं असलं तरी या आंदोलनस्थळी चर्चा मात्र तात्यांची अर्थात वसंत मोरेंची होताना दिसून येते.

Pune MNS Agitation and Vasant More
Vasant More : सोशल मीडियावर हिरो, पुण्याच्या मैदानावर वसंत मोरे झिरो !

महापालिकेच्या सभागृहात मनसेच्या दोन नगरसेवकांचा सातत्याने वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून हटके आंदोलन करण्याचा हातखंडा पाहिला मिळायचा. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर(Sainath Babar) हे कधी मावळे बनवून, कधी यमाच्या वेशात तर कधी बोटी घेऊन हटके आंदोलन करून प्रशासनाला घाम फोडण्याचे काम करत. त्यांची ही आंदोलन सातत्याने चर्चेत असायची.

सध्या वसंत मोरे मनसेत नाहीत, मात्र त्याच स्टाईलने साईनाथ बाबर हे देखील आंदोलन करून एकप्रकारे वसंत मोरेंसोबत केलेल्या मनसेच्या आंदोलनांची आठवण करून देत आहेत.

दोन दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामध्ये शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं पाहायला मिळालं. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती पुणेकरांवरती ओढावली असल्याचं सांगत, सोमवारी पुणे महापालिकेसमोर मनसेकडून(MNS) आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनामध्ये वसंत मोरे यांच्या स्टाईलची झलक पाहायला मिळाली. पूर्वी ज्याप्रमाणे वसंत मोरे हे महापालिके विरोधात बोट घेऊन आंदोलन करत त्याच पद्धतीने आज देखील साईनाथ बाबर यांनी आंदोलन केले.

Pune MNS Agitation and Vasant More
Pune News : पुणे तिथे काहीही शक्य.. ; चक्कं तलाव पात्रात क्रिकेट खेळत 'मनसे' आंदोलन..

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, ' पुण्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शहरातील चौकांमध्ये पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. महापालिकेमध्ये नगरसेवक नसल्याने प्रशासनाला जाब विचारणारे कोणीही नाही. प्रशासनाच्या कामावरती नियंत्रण राहिलेले नाही.

त्यामुळे सध्या पुणेकर हे पुण्यात राहतात का? पाण्यात असा त्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना छोटीशी बोट देऊन पुढील आठ दिवसांमध्ये नालेसफाईचे काम करून पुणेकरांची कोंडी सोडवावी असं निवेदन देणार आहोत. मात्र तसं न झाल्यास पुन्हा एकदा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही बाबर यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com