Pune Mahapalika : अजितदादांचा शेवटच्या टप्प्यात पक्षप्रवेशाचा धुरळा; पुण्यात भाजप, काँग्रेस, ठाकरेंना एकाचवेळी दणका

Pune Mahapalika : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस, भाजप व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून प्रभाग 7 मधून राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित झाले आहेत.
Deputy Chief Minister Ajit Pawar welcoming new entrants into NCP at Jijai Bungalow in Pune ahead of civic polls.
Deputy Chief Minister Ajit Pawar welcoming new entrants into NCP at Jijai Bungalow in Pune ahead of civic polls.Sarkarnama
Published on
Updated on

- समाधान काटे

Pune Mahapalika : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास काही तास शिल्लक असतानाच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

काँग्रेस पक्षातून 2 वेळा आमदारकीची निवडणूक लढवलेले माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी काँग्रेसला रामराम ठोकत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्याचबरोबर माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनीही भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका निता मंजाळकर व त्यांचे पती आनंद मंजाळकर यांनीही शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेशानंतर माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, आशा साने आणि आंजली ओरसे हे चौघेही प्रभाग क्रमांक 7, गोखलेनगर–वाकडेवाडी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar welcoming new entrants into NCP at Jijai Bungalow in Pune ahead of civic polls.
Pune BJP Candidate List : पुण्यातून मोठी बातमी; भाजपच्या मातब्बर उमेदवारांची नावे समोर... बिडकरांसह टिळक, बापट, भिमाले

रवींद्र धंगेकरही अजित पवार यांच्या भेटीला :

शिवसेनेचे महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या पुण्यातील जिजाई बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते देखील आहेत.

युतीचा प्रस्ताव?

रविंद्र धंगेकर यांच्यासोबत किरण साळी हे देखील अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. हे दोघेजण युतीचा प्रस्ताव घेऊन अजित पवारांकडं गेले असल्याची चर्चा आहे. शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या तयारीत आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar welcoming new entrants into NCP at Jijai Bungalow in Pune ahead of civic polls.
Pune BJP : ज्याची भीती,तेच घडलं, पहिली यादी जाहीर होताच पुणे भाजपला पाठोपाठ दोन मोठे धक्के; 'या' नेत्यांनी घेतलं घड्याळ हाती

25 ते 30 जागांचा प्रस्ताव घेऊन धंगेकर अजित पवारांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यानुसार, अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. आता पुण्यात कोणाची कोणासोबत युती होणार? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com