Pune PMC Mayor : महापौर निवडीनंतर भाजपचा केवळ एका ओळीचा प्रस्ताव! ना गुलाल,ना फुले, ना फटाके नेमका काय आहे निर्णय

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर भाजपने कोणताही जल्लोष न करता केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या सभेत अजित पवार यांना श्रद्धांजली ठराव होणार आहे.
Pune Municipal Corporation headquarters as BJP announces a no-celebration policy after mayor and deputy mayor election, limiting proceedings to a one-line congratulatory proposal.
Pune Municipal Corporation headquarters as BJP announces a no-celebration policy after mayor and deputy mayor election, limiting proceedings to a one-line congratulatory proposal.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाची निवड येत्या 9 फेब्रुवारीला होणार आहे. महापालिकेत 165 पैकी भाजपचे 119 नगरसेवक निवडून आल्याने भाजपाकडे मोठं बहुमत असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची असली, तरी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने एका ओळीचा प्रस्ताव पाठवत मोठा निर्णय घेतला आहे. अशी माहिती गटनेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे या दुःखद प्रसंगी भाजपने सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमधून महापौर, उपमहापौर निवडीनंतर गुलाल, फुले, फटाके अथवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे. महापौर उपमहापौर निवडीची ही प्रक्रिया अत्यंत साध्या पध्दतीने पार पाडली जाणार आहे.

याबाबत भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी माहिती दिली आहे, बिडकर म्हणाले, महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच पहिल्याच मुख्य सभेत स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्वपक्षीयांनी राजकीय विरोधी भूमिका टाळून सहकार्य करावे, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

Pune Municipal Corporation headquarters as BJP announces a no-celebration policy after mayor and deputy mayor election, limiting proceedings to a one-line congratulatory proposal.
Pune Political News : पुण्यातले खासदार लयभारी; खर्चासाठी एकापेक्षा एक वरचढ... कुणी किती निधी संपवला?

गणेश बिडकर पुढे म्हणाले, या मुख्य सभेमध्ये माझ्यासह पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी स्वर्गीय अजितदादांसोबत प्रत्यक्षात काम केले असून त्यांचा आम्हा सर्वांना जवळून सहवास लाभला आहे. दादांचे पुण्याच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. असं गणेश बिडकर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com