Pune Municipal Corporation
महाराष्ट्रातील सर्वात जुन्या महानगरपालिकेपैकी एक पुण्याची महानगरापालिका आहे. सध्या 165 नगरसेवक निवडून येतात. आधी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांचे वर्चस्व असलेल्या या महानगरपालिकेवर हळूहळू अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2012मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवून महापौर बनवला होता. पण 2017 मध्ये भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मुक्ता टिळक या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या होत्या. यावेळी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे.