कैलास शिदे : सरकारनामा ब्यूरो
जळगाव : भारतीय जनता पार्टीचे १२ नगरसेवक स्वगृही परतल्याच्या पाश्र्वभूमीवर नगरविकास मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आज जळगाव आणि पाचोरा येथे भेट दिली.पाचोरा येथे देवदर्शनासाठी शिंदे आल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांच्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.
भारतीय जनता पार्टीच्या १२ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, चार दिवसात सर्व १२ नगरसेवक पुन्हा भाजपात परतल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्था होती. या पाश्र्वभूमीवर शिंदे तातडीने पाचोऱ्याला आल्याने त्यांच्या भेटीची चर्चा सुरू झाली.
शिंदे यांचे जळगाव विमानतळावर आगमन होताच त्यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोऱ्याकडे प्रयाण केले. शिंदे यांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.पाचोरा पालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. पालिकेच्या एका प्रकल्पबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तालुक्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील या बैठकीला उपस्थित होते.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.