Ajit Pawar NCP : 'ते आमचे उमेदवारच नव्हेत..' गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांवर अजित पवारांचं भलतंच स्पष्टीकरण...

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना आणि गुंड गजा मारणे याच्या पत्नीला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे गुन्हेगारी संपवा म्हणणारे अजितदादा दुसरीकडे गुंडांच्या कुटुंबीयांना तिकीट देत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Ajit Pawar addressing the media over the Pune Municipal Election controversy, responding to allegations regarding NCP candidates linked to criminal families.
Ajit Pawar addressing the media over the Pune Municipal Election controversy, responding to allegations regarding NCP candidates linked to criminal families.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 Jan : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील तिन्ही मित्रपक्ष एकामेकांविरोधात मैदानात उतरले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याकडे सर्व पक्षांचे लक्ष असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली आहे.

या उमेदवारीवरून सध्या आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झालं आहे. मात्र या आरोपांवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच गुंड गजा मारणे याच्या पत्नीला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे एकीकडे गुन्हेगारी संपवा म्हणून पोलिसांना सक्त ताकीद देणारे अजितदादा दुसरीकडे गुंडांच्या कुटुंबीयांना तिकीट देत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता अजित पवारांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar addressing the media over the Pune Municipal Election controversy, responding to allegations regarding NCP candidates linked to criminal families.
Shiv Sena AB form rejected : वर्ष सरताच शिंदेंच्या शिवसेनेला दणका! एबी फाॅर्म भरताना उमेदवारांचा प्रताप, झेराॅक्स, खाडाखोड, व्हाईटनर अन् सह्यांची चूक...

अजित पवार म्हणाले, 'आतापर्यंतच्या सर्व निवडणुका आठवल्या तर तुम्हाला समजेल की आमची आरपीआय सचिन खरात गटासोबत युती झालेली आहे. या महापालिका निवडणुकीत देखील त्यांच्यासोबत युती असून त्यांना काही जागा आम्ही सोडल्या आहेत.

Ajit Pawar addressing the media over the Pune Municipal Election controversy, responding to allegations regarding NCP candidates linked to criminal families.
Thane Municipal Election : शिंदेंच्या उमेदवाराच्या अर्जातही त्रुटी, पण बाद केले फक्त मनसे, वंचित अन् ठाकरेंच्या शिवसेनेचे, निवडणूक अधिकाऱ्यांवर पक्षपात केल्याचा आरोप

त्यामुळे ज्यांच्यासोबत आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्या जागांवर त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा निर्णय असतो. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म देण्याबाबत गोंधळ सुरू होता. कोण कुठे जातं कुठून उमेदवारी याबाबत संपूर्णपणे गोंधळाचं वातावरण होतं.'

सचिन खरात यांच्यासोबत आमची युती झाली असून त्यांना काही जागा आम्ही दिल्या असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. एक प्रकारे अजित पवार यांनी सचिन खरात यांच्या पक्षाच्या माध्यमातून या गुन्हेगारी कुटुंबांना उमेदवारी दिल्या असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना सचिन खरात यांनी मी याबाबत अजित पवार यांच्याशी सविस्तर बोलल्यानंतरच प्रतिक्रिया देईन असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com