

Pune Mahapalika : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये वादाला तोंड फुटलं आहे. प्रभाग क्रमांक 22 मधील दोन भाजप उमेदवारांमध्ये रविवारी रात्री झालेल्या पक्षाच्या बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. अखेर प्रकरण थेट खडक पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. पण निवडणुकीच्या तोंडावर वाद पोलीस स्टेशनच्या बाहेरच थांबवण्याता आला आणि वरिष्ठांकडे विषय मांडण्याचा निर्णय झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारचा प्रचार संपल्यानंतर पक्षाची बैठक झाली. यात भाजपच्या एक महिला उमेदवाराच्या भावाने दुसऱ्या महिला नगरसेविकेवर गद्दारीचे आरोप केले. "मागील निवडणुकीत जसा दगा फटका केला, तसा या निवडणुकीत करू नका," असा खोचक टोमणा मारला. यावरूनच वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये खटके उडाले.
क्रॉस व्होटिंग आणि एकाच पॅनलमध्ये राहून एकमेकांविरोधात मतदान न करण्यावर चर्चा सुरु होती. मात्र, मागील निवडणुकीच्या अनुभवाचा विषय निघाला आणि वाद आणखी वाढला. रात्री उशिरापर्यंत हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी खडक पोलीस स्टेशन गाठले आणि एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तक्रार दाखल झाल्यास पक्षाची निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाची बदनामी होईल, अशी स्थानिक नेत्यांनी समजूत काढून कार्यकर्त्यांना शांत केले.
सोमवारी हा सगळा वाद वरिष्ठ नेत्यांकडे मांडला जाणार आहे. पण आता या पॅनेलमधील इतर उमेदवारांनी संबंधित महिला उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चारही उमेदवारांनी एकत्रित प्रचारासाठी जी कचेरी सुरू केली होती त्या कचेरीवरील एक महिला उमेदवाराचा पोस्टर देखील झाकण्यात आला आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपच्या अंतर्गत कलहाने पक्षाला मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. एकाच पॅनलमधील उमेदवारांमधील या संघर्षामुळे पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.