Pooja Jadhav Candidate Withdrawal: पुण्यात पूजा जाधव यांना ऐनवेळी माघार घ्यायला लावली, त्या प्रभागात भाजपचं काय झालं? किती उमेदवारांचा गेम?

Pune Municipal Election Results News : ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने पूजा धनंजय जाधव यांना प्रभाग क्रमांक दोन ‘क’ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी फॉर्म भरून प्रचारही सुरु केला होता.
Pooja Dhananjay Jadhav BJP
Pooja Dhananjay Jadhav BJPSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. मात्र, या जाहीर झालेल्या निकालानंतर भाजपच्या दृष्टीने धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने पूजा धनंजय जाधव यांना प्रभाग क्रमांक दोन ‘क’ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी फॉर्म भरून प्रचारही सुरु केला होता. मात्र, अजित पवार गटाकडून त्यांचे पाठीमागील वक्तव्य पुढे आणत सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही पूजा जाधव यांना ट्रोल केले. हे ट्रोलींग इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले की पूजा जाधव यांना 24 तासातच भाजपच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, निकाल लागल्यानंतर भाजपला याचा मोठा फाटका बसल्याचे पुढे आले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर भाजपने (BJP) पूजा धनंजय जाधव यांना प्रभाग क्रमांक 2 ‘क’ मधून उमेदवारी दिली होती. त्यानंतर प्रचार सुरूही झाला. मात्र, पूजा जाधव यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ अजित पवार पक्षांच्या नेत्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. त्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील जाधव यांना ट्रोल केले. त्यामुळे जाधव यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. त्यामुळे या टीकेची दखल घेणे भाग पडले.

Pooja Dhananjay Jadhav BJP
BJP-Shivsena News : भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या लाडक्या संभाजीनगरमधून दोन्ही शिवसेनेला 'उखाड दिया'!

यासर्व ट्रोलींगमुळे भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून पूजा जाधव यांनी 24 तासात उमेदवारी अर्ज मागे घेतला. या सर्व प्रकारानंतर पूजा जाधव यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व बाबींचे स्पष्टीकरण देखील दिले होते. तर भाजपने दुसरीकडे अपक्ष उमेदवार असेलल्या अदिती बाबर या उमेदवाराला पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी दिली होती. त्या सर्व प्रकरणाचा एकंदरीत प्रभाग एक आणि प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा परिणाम झाल्याचे पाहवयास मिळाला.

Pooja Dhananjay Jadhav BJP
NCP setback : महापालिकेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीची आशा फोल, खुर्ची नाट्य भोवले; काँग्रेसचे माजी सत्तापक्षनेते वनवे पराभूत

पूजा जाधवांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यामुळे या दोन प्रभागातील मतमोजणीनंतर मोठा फेरबदल झाला असल्याचे पुढे आले आहे. याठिकाणी शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल लागला आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजप ऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पॅनेल निवडून आले आहे. त्यामध्ये नंदिनी धेंडे, रवी टिंगरे, शीतल सावंत, सुहास टिंगरे हे विजयी झाले तर याठिकाणचा प्रभाव तर प्रभाग क्रमांक एक क मध्ये जाणवला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे विजयी झाल्या. तर प्रभाग एकमध्ये अन्य तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले.

Pooja Dhananjay Jadhav BJP
Sangali Congress : चंद्रकांतदादांनी काँग्रेसला अक्षरशः मोकळं केलं... पण सांगलीत विश्वजित कदम, विशाल पाटलांनी पक्ष सावरला : बहुमत गाठताना भाजपची दमछाक

एकंदरीतच पूजा जाधव यांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगणे भाजपच्या चांगेलच अंगलट आले आहे. एकीकडे पुणे महापालिका निवडणूक निकालात भाजपने बहुमताचा आकडा पार केला असला तरी या पाच जागेवर झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Pooja Dhananjay Jadhav BJP
BJP victory Ahilyanagar : माजी महापौरानं चांगलंच मनावर घेतलं; राजकीय वारसा नसलेल्या ‘पीए’च्या आईला भाजपकडून नगरसेवक केलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com